Diwali Lakshmi Puja Prasad : दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्साहात लक्ष्मी पूजन या सणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू पंचांगानुसार, हा सण आश्विन महिन्याच्या अमावास्येच्या रात्री साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मीला प्रसाद दाखवला जातो, प्रसाद तुम्ही घरीच बनवू शकता. फक्त दुधापासून तुम्ही स्वादिष्ट अशी मिठाई बनवू शकता. रेसिपी अगदी सोपी आहे आणि शिवाय पटकन होणारी आहे. चला तर मग पाहुयात कलाकंद कसा बनवायचा.
कलाकंद साहित्य –
- २ टेबलस्पून मिल्क पावडर
- ४०० ग्रॅम कंडेन्स मिल्क
- अर्धा किलो पनीर
- चवीनुसार वेलची पावडर
- वरुन टाकायला बदाम, पिस्ता असा सुकामेवा.
कलाकंद कृती –
- सगळ्यात आधी एक पॅन गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क टाका.
- मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क व्यवस्थित हलवून घ्या. त्याचा रंग थोडा बदलू लागला आणि ते थोडं घट्ट झालं की त्यात पनीर क्रश करून टाका.
- हे सगळं मिश्रण पुन्हा व्यवस्थित हलवून घ्या आणि मंद ते मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे शिजू द्या.
- त्यानंतर त्यात थोडीशी विलायची पावडर टाका. एका ताटाला तुपाचा हात फिरवा आणि हे गरमागरम मिश्रण त्यावर टाकून ते एकसारखं ताटभर पसरवा.
- आता ताटातलं मिश्रण थोडं थंड झालं की ताट एक ते दोन तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
- त्यानंतर कलाकंद छान जमून येईल आणि त्याच्या तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडता येतील.
बहुतेक लोक फाटलेल्या दुधाचे पाणी फेकून देतात, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की याच्या पाण्यात भरपूर प्रोटीन असते. त्याचे पाणी आजच आपल्या आहाराचा भाग बनवा आणि आपले शरीर निरोगी ठेवा.