उन्हाळा सुरु झाला आहे. वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे लोक हैरान झाले आहे. अशा स्थितीमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून पुरेश्या प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्यासह शरीराला थंडावा देणारे पेय देखील पिण्याचा सल्ला दिला जाते. उन्हाळ्यातील थंडगार पेय म्हणजे लिंबू सरबत, कैरीचे पन्हे आणि जलजीरा. हे पेय शरीराला थंडावा देतात आणि शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करता. तुम्हालाही या उन्हाळ्यात थंडगार जलजीराचा आनंद घेता येईल. त्यासाठी आवश्यक जलजीरा पावडर तुम्ही घरीच बनवू शकता आणि हवे तेव्हा झटपट जलजीरा पिऊ शकता. उन्हाळ्यात पाहुणे आल्यास किंवा लहान मुलांना देण्यासाठी देखील हा उत्तम पर्याय आहे. ही जलजीरा पावडर साधारण ३ महिन्यांपर्यत साठवू ठेवू शकता. चला तर मग रेसिपी लिहून घ्या..
जलजीरा पावडर रेसिपी
साहित्य
जलजीरा पावडरसाठी
जीरा – ४ चमचे
काळी मिरी – १.५ चमचे
वाळवलेले डाळिंबाचे दाणे – १ टीस्पून
सुंठ – १टीस्पून
काळे मीठ – १ टीस्पून
खडे मीठ – १ टीस्पून
आमचूर पावडर – १ टीस्पून
पुदिन्याची कोरडी पाने – ४ टीस्पून
हिंग – १/४ टीस्पून
जलजीरा तयार करण्यासाठी
बर्फ
जलजीरा पावडर
पुदिन्याची ताजी पाने
लिंबाचा रस
सोडा – पाणी
हेही वाचा – थंडगार दही पोहे, एकदा खाल तर खातच राहाल, ही घ्या सोपी रेसिपी
जलजीरा पावडर बनवण्याची कृती
५ मिनिटे मंद आचेवर जिरे आणि काळी मिरी भाजून घ्या. वाळवलेले डाळिंबाचे दाणे घालून २-३ मिनिटे भाजून घ्या.
गॅस बंद करा आणि वाळलेल्या पुदिन्याच्या पानांसह इतर सर्व मसाले घाला. सर्वकाही चांगले मिसळा आणि ५ मिनिटे थंड होऊ द्या.
बारीक पावडर करून घ्या आणि हवाबंद डब्यात साठवा.
हेही वाचा – पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी
थंडगार जलजीरा कसा बनवावा
एका ग्लासात बर्फ घ्यात त्यात जलजीरा पावडर, पुदिन्याची ताजी पाने, लिंबाचा रस
सोडा, पाणी टाका. थंडगार जलजीरा तयार आहे.