हिवाळ्यात मिळणाऱ्या विविध हिरव्या पालेभाज्या फक्त तुमच्या जिभेचे चोचले पुरवत नाही तर ते आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात. पालेभाज्या हा आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. सर्वच पालेभाज्या आरोग्यासाठी पोषक असतात. पण काही पालेभाज्या विशिष्ट ऋतूत मिळतात आणि त्या विशिष्ट ऋतूत खाल्ल्या तर जास्त फायदेशीर ठरतं.बटाटा-फ्लावरच्या भाजीविना जणू काही थंडीची मजाच अपूर्ण राहते. तसंच फ्लावरचे भजी देखील थंडीच्या महिन्यात अगदी चवीने खाल्ले जाऊ शकतात. फ्लावर पचनास अतिशय हलके व सुपाच्य असतात. फ्लावरचे भजी चवीस आणि आरोग्याय दोन्हीसाठी उत्तम असतात. तसेच थंडीत गराम गरम भजी खाण्याची मजा काही औरच. चला तर आज पाहुयात फ्लावरची भजी

फ्लावर भजी साठी लागणारे साहित्य

  • २०० ग्राम फ्लॉवरचे तुकडे
  • १ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट
  • १/२ टेबलस्पून लाल तिखट
  • १/२ टेबलस्पून मीठ
  • १/२ टीस्पून ओवा
  • चिमटभर खायचा सोडा
  • १/२ वाटी बेसन पीठ
  • कोथिंबीर, तळणीसाठी तेल

फ्लावर भजी साठी कृती –

  • फ्लावरचे लहान लहान तुकडे सर्वप्रथम हळद मीठाच्या गरम पाण्यात भिजवून ठेवावेत.
  • एका पॅनमध्ये आल लसूण पेस्ट घ्यावी. बेसन पिठ,लाल तिखट, मीठ, ओवा घालून घ्यावा.
  • आता पाणी घालून गुठळ्या होणार नाही असे हलवून पिठ भिजवून घ्यावे. नंतर फ्लॉवरचे तुरे आणखी एकदा धूवून घ्यावेत आणि पिठात घालावेत.

हेही वाचा >> कशी बनवायची कुरडयांची भाजी? रोजच्यापेक्षा वेगळी आणि छान चटपटीत भाजी..

  • तेल गरम करून त्यात भजी सोडावेत. गरमा गरम तयार पकोडे साॅस व चहासोबत सर्व्ह करावेत.