Fruit Custard Recipe: उन्हाळा म्हटलं की या ऋतूंत आपल्याला सतत काहीतरी थंड खावेसे वाटते. उन्हाळयात आपण बरेचदा आईस्क्रीम, शीतपेय, कोल्ड ड्रिंक्स, सरबत असे असंख्य पदार्थ खातो. शक्यतो जेवणानंतर आपल्याकडे काहीतरी गोड, थंडगार डेझर्ट खाण्याची अनेकांना सवय असते. या डेझर्ट प्रकारामध्ये, भारतात अतिशय लोकप्रिय असणारा पदार्थ म्हणजे फ्रुट कस्टर्ड. चला तर याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.

फ्रुट कस्टर्ड साहित्य –

१/२ लिटर दुध
३ टे स्पून कस्टर्ड पावडर
१ टे स्पून साखर
३-४ थेंब व्हानीला इसेन्स
सिझनल फ्रुट (द्राक्ष, संत्री, आंबा, केळे, चिकू, अंजीर, अननस)

फ्रुट कस्टर्ड कृती –

फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी सुरुवातीला कस्टर्ड शुगर बनवण्यासाठी १ कप दुधात कस्टर्ड पावडर, साखर मिक्स करून घ्या.

बाकीचे दुध गरम करून कस्टर्ड पावडरचे दुध हळू-हळू मिक्स करा .

मिश्रण घट्ट होई परंत मंद विस्तवावर हलवत रहा. घट्ट झाले की थंड करायला ठेवा.

सर्व्ह करताना आपल्याला पाहिजे ती फळे सोलून तुकडे करून मिक्स करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरून स्ट्बेरी सॉसने सजवून मग थंड सर्व्ह करा.