कोकणी खाद्यसंस्कृती ही विविध पाककृतींनी समृद्ध आहे. यामुळे केवळ देशातीलच नाही तर आता जगभरातील खाद्यप्रेमींना कोकणी पदार्थ भुरळ घालताना दिसतात. कोकणी पद्धतीने बनवलेले चिकण आणि मासे अनेकांना फार आवडतात.अशीच एक आगळी वेगळी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत ओल्या सोड्याच्या वड्या रेसिपी…चला तर मग जाणून घेऊयात कृती..

ओल्या सोड्याच्या वड्या साहित्य

१. १ सोड्याचा वाटा
२. १ मोठा कांदा
३. २ हिरव्या मिरच्या
४. थोडी कोथिंबीर
५. १ चमचा मसाला
६. १/२ चमचा हळद
७. ३ चमचे बेसन
८. १ चमचा तांदळाचे पीठ
९. चवीप्रमाणे मीठ
१०. तवा फ्राय साठी तेल
११. अर्ध्या लिंबाचा रस

ओल्या सोड्याच्या वड्या कृती

१. प्रथम सोडे स्वच्छ करून त्याचे कव्हर काढून घेणे व ते धुऊन एका भांड्यात घेणे त्यात बेसन, तांदळाचे पीठ, कांदा, मिरची, कोथिंबीर, मसाला, हळद, मीठ व अर्धा लिंबू चा रस्सा सर्व घालून एकजीव करून घेणे.

२. एकत्र केलेल्या मिश्रणातून एक छोटा गोळा बनवून तो हातावर गोल पसरवून घ्यावा.

३. गॅस वर तवा ठेवून तो गरम झाल्यानंतर त्यात थोडे तेल घालून तयार केलेली वडी तव्यात घालून गोल्ड कलर येईपर्यंत दोन्ही साईट शिजवून घेणे.

हेही वाचा >> मटणासारखं गावरान पद्धतीचं मुशी मच्छीचं झणझणीत कालवण; ही घ्या सोपी रेसिपी

४. ओल्या सोड्याच्या वड्या सर्व्ह करण्यास तयार.