God Bhakari : भाकरी ही महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमधील महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रीयन जेवणात भाकरीला खूप महत्त्व आहे. भाकरीबरोबर झुणका, ठेचा, बेसन आवडीने खाल्या जाते. तुम्हाला सुद्धा भाकरी आवडते का? भाकरी हा शब्द जरी उच्चारला तरी तुमच्या समोर ज्वारी, नाचणी आणि बाजरीच्या पीठापासून बनवली जाणारी भाकरी समोर येते. खरं तर या भाकरी अत्यंत पौष्टिक असून तितक्याच चविष्ठ वाटतात. भाकरीच्या या प्रकारामध्ये आणखी एक प्रकार आहे जो फार क्वचितच लोकांना माहिती आहे. तुम्ही कधी गव्हाच्या पीठाची भाकरी खाल्ली आहे का? किंवा गोड भाकरी खाल्ली आहे का?

खरं तर भाकरी ही गोड कधीच नसते पण मुलांसाठी तुम्ही ही गव्हाच्या पीठापासून बनवली जाणारी गोड भाकरी बनवू शकता. गव्हाचे पीठ, तूप आणि गुळाचे पाणी याचे मिश्रण करुन बनवली जाणारी ही पौष्टिक गोड भाकरी तुम्ही निरोगी आहाराचा भाग बनवू शकता आणि मुलाला आगळा वेगळा गोड पदार्थ बनवून देऊ शकता. गोड भाकरीची चव ही अत्यंत स्वादिष्ट वाटते. लहान मुलांना टिफीनवर किंवा सकाळी नाश्तामध्ये सुद्धा तुम्ही ही गोड भाकरी देऊ शकता. मुलांना ही भाकरी नक्की आवडेल. ही गोड भाकरी कशी बनवली जाते, चला तर जाणून घेऊ या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहित्य

  • गव्हाचे पीठ
  • गूळ
  • तूप
  • मीठ
  • पाणी

हेही वाचा : Turichya danyache Vade : हिवाळ्यात बनवा तुरीच्या दाण्याचे कुरकुरीत वडे; ट्राय करा ही हटके रेसिपी

कृती

  • सुरुवातीला गूळ पाण्यात चांगला विरघळून घ्यावा.
  • त्यानंतर एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्यावे.
  • त्यात तुपाचे मोहन आणि मीठ घालावे आणि नीट एकत्रित करावे.
  • गूळाच्या पाण्याने हे पीठ घट्ट भिजवून घ्यावे.
  • या पीठाचा मळलेला गोळा अर्धा तास झाकून ठेवावा.
  • त्यानंतर नेहमीसारख्या भाकऱ्या लाटून घ्याव्यात.
  • आणि या पोळ्या गरम तव्यावर भाजून घ्याव्यात.
  • भाकरी भाजताना दोन्ही बाजूला नीट तूप सोडावे आणि चांगले परतून घ्यावे.
  • गोड भाकरी तयार होणार.
  • ही गरम गरम भाकरी सर्व्ह करावी
  • ही भाकरी तुम्ही तूप, लोणचे किंवा कोशिंबीरबरोबर खाऊ शकता.