लहान मुलं सहसा कोणतीही भाजी आवडीने खात नाहीत. मात्र त्यांना त्यांच्या आवडत्या पदार्थमध्ये सोपा ‘जुगाड’ करून जर त्या भाज्या खाण्यासाठी दिल्या तर मात्र अगदी मिटक्या मारत मुलं कोणताही पदार्थ, कोणत्याही भाजीसह खातात. अनेकदा सिमला मिरची, गाजर, बिट यांसारख्या भाज्या पाहिल्या कि मुलं नाक मुरडतात. पण युट्युबवरील VaishalisRecipes नावाच्या अकाउंटने शेअर केलेली डोसा रेसिपी तुमची मदत करू शकते.

तांदळाच्या पिठापासून आणि भाज्यांचा वापर करून, अतिशय झटपट तयार होणारे असे डोसे सकाळी नाश्त्यासाठी बनवता येऊ शकतात. ही डोसे तयार करण्यासाठी नेमके साहित्य, कृती आणि प्रमाण काय आहे हे जाणून घ्या. तसेच रेसिपी पाहून एकदा बनवून पाहा.

हेही वाचा : Recipe : चटपटीत चटकदार ‘मसाला कैरी’; पाहा साहित्य, कृती अन् प्रमाण…

साहित्य

तांदुळाचे पीठ
कांदा
गाजर
हिरवी मिरची
कढीपत्ता
कोथिंबीर
चिली फ्लेक्स
हिंग
मीठ
तेल

हेही वाचा : Recipe : वर्षभर टिकणारे साबुदाणा पापड कसे बनवावे? पापडाचे वाळवण कसे घालावे? पाहा हे प्रमाण

कृती

  • सर्वप्रथम एका बाऊलमध्ये एक वाटी तांदळाचे पीठ घ्यावे.
  • त्यामध्ये साधारण अडीच वाटी पाणी घालून तांदळाचे पीठ कालवून घेऊ.
  • पाणी घालताना तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, किसलेले गाजर, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्यावे.
  • सर्व भाज्या घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, चिलीफ्लेक्स, हिंग आणि बारीक चिरलेली मिरची घालून घ्या.
  • आता तांदळाच्या पिठाचे हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊ.
  • पाच ते दहा मिनिटे हे पीठ झाकून ठेऊन द्यावे. आपले डोश्याचे पीठ तयार आहे.
  • डोसे करण्यासाठी गॅसवर एक नॉनस्टिक तवा तापवत ठेवावा.
  • यावर चमच्याच्या मदतीने थोडेसे तेल पसरून घ्या.
  • आता या तव्यावर तयार डोश्याचे पीठ एकसमान पसरून घ्या.
  • पसरलेल्या डोश्यावर पुन्हा थोडेसे बटर, तूप किंवा तेल लावून घ्यावे.
  • दोन्ही बाजूंनी डोसा कुरकुरीत भाजून घ्यावा.
  • तयार डोसा एका ताटलीमध्ये काढून, चटणी किंवा सॉसबरोबर खाण्यासाठी घ्यावा.

टीप – यामध्ये तुम्हाला हव्या असतील त्या भाज्या बारीक चिरून किंवा किसून घालू शकता.
तसेच तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी हे कुरकुरीत आणि पौष्टिक डोश्याची रेसिपी युट्युबवरील @VaishalisRecipes नावाच्या चॅनलने शेअर केली आहे. हे डोसे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी मुलांना खाऊ म्हणून बनवू शकता.