Summer special recipe : चटपटीत आंबट-गोड आणि लाल रंगाची मसाला कैरी आपल्यापैकी अनेकांनी खाल्ली असेल. अशी कैरी विशेषतः शाळेच्या बाहेर जे चिंचा-बोरं विकण्यासाठी बसायचे त्यांच्याकडे हमखास मिळायची. या मस्त चटकदार कैरीचे नुसते नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. आता हळूहळू बाजारात कैऱ्या दिसू लागल्या आहेत.

तसेच वाळवण घालण्यासाठीदेखील योग्य वातावरण आहे. चला तर मग, आज हीच आपल्या शाळेच्या दिवसांची आणि बालपणाची आठवण करून देणारी मसाला कैरी कशी बनवायची ते पाहू. ही भन्नाट आणि चटपटीत रेसिपी युट्युबवरील ShagunsKitchen86 नावाच्या चॅनलने शेअर केली आहे. अर्धा किलो मसाला कैरी बनवण्यासाठी पदार्थांचे योग्य प्रमाण काय आहे ते बघून, लगेच बनवून पाहा.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : Recipe : वर्षभर टिकणारे साबुदाणा पापड कसे बनवावे? पापडाचे वाळवण कसे घालावे? पाहा हे प्रमाण

साहित्य
कैरी
लाल तिखट
जिरे पावडर
हळद
मिरपूड
काळे मीठ
पिठी साखर

कृती

सर्वप्रथम अर्धा किलो गावरान कैरी स्वच्छ धुवून घ्यावी.
आता सर्व कैऱ्यांची सालं सोलाण्याने सोलून घ्या.
आता सर्व कैऱ्यांच्या लहान आकाराच्या पातळ आणि बारीक फोडी करून घ्या.
आता या सर्व पातळ फोडींना एका परातीमध्ये घ्यावे.
परातीमधील कैऱ्यांवर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरपूड, एक चमचा जिरेपूड घालून घ्यावी.
त्याचबरोबर, अर्धा चमचा काळे मीठ, अर्धा चमचा साधे मीठ आणि सर्वात शेवटी तीन चमचे पिठीसाखर घालून घ्यावी.
सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर कैरीच्या सर्व फोडी हाताने मसाल्यांमध्ये मिसळून घ्या.
कैऱ्यांना एकसमान मसाले लागतील याची काळजी घ्या.

हेही वाचा : Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण

आता या कैरीचे वाळवण घालण्यासाठी, परातीमधील कैरीची एकेक फोड दुसऱ्या ताटामध्ये पासून घ्या.
ताटातील कैरीच्या फोडी एकमेकींना चिकटणार नाही याची काळजी घ्या. फोडी एकमेकींना चिकटल्यास त्यांना पाणी सुटेल तसेच वाळवण वळण्यासाठी वेळ लागेल.
आता मालास कैरीचे हे वाळवण दोन दिवस कडक उन्हात वाळवून घ्या.
सर्व कैऱ्या व्यवस्थित वाळल्यानंतर त्यांना एखाद्या बरणीत साठवून ठेवा.
वाळवण साठवण्यासाठी आधी बरणी स्वच्छ धुवून, कोरडी करावी. त्यानंतर यात मसाला कैरी भरून झाकण घट्ट बंद करून घ्या.
तयार आहे आपली आंबट-गोड आणि चटपटीत अशी मसाला कैरी.

टीप- कैरीच्या फोडी मसाला लावायच्या आधी कोरड्या असाव्या.
वाळवण घालताना कैरीच्या फोडींमध्ये अंतर असणे गरजेचे आहे.
वाळवण भरताना कैरीच्या फोडी कोरड्या असाव्या. नाहीतर तयार पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असते.

मसाला कैरीची ही रेसिपी @ShagunsKitchen86 नावाच्या युट्युब चॅनलने शेअर केली आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ९७३K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader