बटाट्याचे वेफर्स खायला अनेकांना आवडतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण ते आवडीने खातात. उपवासाला देखील बटाट्याचे वेफर्स खाल्ले जातात. अनेकजण बाजारातून वेफर्स विकत आणतात. हे वेफर्स महाग देखील असतात तसंच ते कशाप्रकारे बनवले गेले आहेत याची आपल्याला माहिती नसते. तर आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी वेफर्स कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे वेफर्स अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतात. आणि विशेष गोष्ट म्हणजे हे वेफर्स वर्षानुवर्षे खराब होत नाही. चला तर मग जाणून घेऊया फक्त अर्ध्या तासात बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे?

जाणून घ्या बटाटा वेफर्स बनवण्याची भन्नाट रेसिपी

  • बटाटा वेफर्स बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे घ्या आणि त्याची साले काढून घ्या.
  • त्यानंतर बटाट्याचे स्लाईज करून घ्या आणि त्यांना पाण्यात घाला.
  • त्यानंतर एका भांड्यात स्वच्छ पाणी उकळायला ठेवा आणि त्यात हे बटाट्याचे स्लाईज घाला.

येथे पाहा व्हिडिओ

View this post on Instagram

A post shared by Amma Ki Thaali (@ammakithaali)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(हे ही वाचा: न लाटता फक्त १० मिनिटांत तयार करा रव्याचे कुरकुरीत पापड; रवा भिजवण्याची देखील गरज नाही)

  • बटाटे अर्धवट उकळले की गॅस बंद करा आणि वेफर्समधलं पाणी काढून घ्या.
  • त्यानंतर एका मोठ्या कपड्यावर हे वेफर्स सुकवायला ठेवा.
  • १ ते २ दिवस कडक उन्हात हे वेफर्स चांगले सुकतील.
  • त्यानंतर हे वेफर्स तळून घ्या.
  • अशाप्रकारे तयार आहेत खमंग, कुरकुरीत वेफर्स.