Soft Chapati Secret : पोळी हा दररोजच्या जेवणातला सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे. पोळीशिवाय जेवण अपूर्ण वाटते. अनेकांची तक्रार असते की त्यांनी बनवलेल्या पोळ्या मऊ लुसलुशीत होत नाही पण काही खास टिप्सच्या मदतीने तुम्ही मऊ पोळ्या बनवू शकता. युट्यूबवर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लुसलुशीत पोळी बनवण्यासाठी काही खास टिप्स सांगितल्या आहे. मऊ लुसलुशीत पोळी कशी बनवावी? चला तर जाणून घेऊ या.

  • सर्वात आधी गव्हाचं पीठ चाळणीने गाळून घ्या.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला.
  • त्यानंतर पीठ पाणी घालून चांगले मळून घ्या.
  • पीठ ओबडधोबड मळल्यानंतर पिठामध्ये बोटाने खड्डे करायचे.
  • त्यानंतर पीठ १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.
  • परत हाताला थोडे तेल लावून पीठ पुन्हा मळून घ्या.
  • त्यानंतर या पीठाचे गोळे तयार करा.
  • एक पीठाचा गोळा घ्या. पुरी आकाराएवढी पोळी लाटून घ्या.
  • त्यानंतर त्याच्या एका बाजूला तेल लावा. त्यानंतर पोळी फोल्ड करा आणि पुन्हा तेल लावा. त्यावर कोरडं पीठ घाला आणि पुन्हा पोळी त्रिकोणी आकाराने फोल्ड करा.
  • त्रिकोणी आकाराची पोळी तुम्ही त्रिकोणी ठेवू शकता किंवा लाटून गोल बनवू शकता.
  • गरम तव्यावर थोडं तेल टाका आणि ही चपाती त्यावर टाका.
  • चपाती दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्या.
  • मऊ लुसलुशीत चपाती तयार होईल.

हेही वाचा : Puri Recipe : या’ ५ चुका टाळा अन् बनवा टम्म फुगणाऱ्या कमी तेलकट पुऱ्या, नोट करा रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Solapuri Tai या युट्यूब अकाउंटवर पीठ मळण्यापासून ते चपाती बनवेपर्यंत सर्व महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक सांगितल्या आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही मऊ लुसलुशीत पोळी बनवू शकता.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलेय, “परफेक्ट चपाती ताई” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “छान मस्त मऊसर चपाती झाली ताई ” आणखी एका युजरने लिहिलेय, “अशी चपाती खायला खुपच आवडेल”