How to make aam panna : कैऱ्या आणि आंबे यंदाच्या उन्हाळी मौसमात आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बाजारात सज्ज झालेले आहे. कैरी म्हंटली कि कैरीचे गोड आणि तिखट लोणचे, चुंदा, मसाला कैरी आणि पन्हे अशा सर्व पदार्थांची यादी डोळ्यापुढे उभी राहते.

मात्र यंदा घरी पन्ह्यासाठी कैरी आणल्यावर त्याचे गोड सरबत करण्याऐवजी, पोटाला आराम देणारे आणि जिभेचे चटपटीत चोचले पुरवणारे ‘मसाला पन्हे’ आवर्जून बनवून पाहा. मिरची-पुदिन्याची चव असलेले हे मसाला पन्हे कसे बनवायचे याची भन्नाट रेसिपी युट्युबवरील vmiskhadyayatra103 नावाच्या चॅनलवरून शेअर झाली आहे. चला तर मग या आगळ्यावेगळ्या पन्ह्याची रेसिपी आणि कृती पाहू.

Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

हेही वाचा : Summer special recipe : चटपटीत मसाला कैरी! प्रमाण अन् कृती बघा; बनवून पाहा

चटपटीत मसाला पन्हे :

साहित्य

कैरी कच्ची
साखर
गूळ
कोथिंबीर
हिरवी मिरची
पुदिना
लिंबाचा रस
भिजवलेला सब्जा
बर्फाचे खडे

हेही वाचा : Recipe : चटपटीत चटकदार ‘मसाला कैरी’; पाहा साहित्य, कृती अन् प्रमाण…

कृती

पन्ह्याची पूर्वतयारी –

सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून कैरीची सालं सोलून घ्या. सोललेल्या कैरीच्या फोडी चिरून घ्या.
आता चिरलेल्या कैरीच्या फोडी कुकरमध्ये घालून त्यांना छान उकडून घ्यावे.
कुकरच्या शिट्या होईन, तो थंड झाल्यावर कुकरमधील छान उकडून निघालेली कैरी एका पसरट ताटात काढून घ्या.
कैऱ्या गार झाल्यानंतर, त्यांना एका बाऊलमध्ये घेऊन हाताने छान कुस्करून घ्या. तुम्हाला कैरीचा गर अधिक चांगल्या पद्धतीने एकजीव करायचा असेल तर त्यासाठी कुस्करलेली कैरी मिक्सरला वाटून घेऊ शकता.
आता कुस्करलेल्या कैरीच्या समप्रमाणात त्यामध्ये साखर आणि पन्ह्याला सुंदर रंग आणि चव येण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे गूळ घालून घ्या.

पन्ह्यासाठी चटणी बनवू –

यासाठी मिक्सरच्या भांड्यात १ हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर आणि पुदिन्याची ३-४ पाने घ्या. तसेच यामध्ये साधारण अर्धा चमचा लिंबाचा रस घालून घ्या. सर्व पदार्थ मिक्सरला बारीक वाटून घ्यावे.
पन्ह्यासाठी आपली चटणी तयार आहे.

हेही वाचा : स्पेशल कोकणी रेसिपी : कैरी घालून ‘वाटपाची डाळ’ कशी बनवावी? काय आहे साहित्य, Recipe पाहा…

चटपटीत मसाला पन्हे बनवू –

सुरवातीला मिक्सरमधून छान वाटून घेतलेल्या कैरीच्या गरामध्ये, केवळ अर्धा चमचा तयार हिरवी चटणी घालून घ्या.
तसेच आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून, पन्ह्याचे मिश्रण एकदा ढवळून घ्यावे.
आता या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून पन्हे चांगले ढवळून घ्या. पाण्याचे प्रमाण हे १:३ म्हणजे, एक वाटी कैरीच्या गराला तीन वाट्या पाणी असे आहे.
पाणी घालून पन्हे व्यवस्थित ढवळून त्यामध्ये तुम्हाला हवे असल्यास बर्फाचे काही खडे घाला.
तयार आहे आपले थंडगार, चटपटीत मसाला पन्हे.

युट्युबवरील@ vmiskhadyayatra103 या चॅनलने दाखवलेली ही आगळीवेगळी चटपटीत पन्ह्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर यंदाच्या उन्हाळ्यात घरी येणाऱ्या पाहुण्यासाठी एकदा बनवून पाहा.