Cooking Tips: कुरकुरीत, चवदार आणि स्वादिष्ट असे वेफर्स हा असा पदार्थ आहे जो खाण्यासाठी कोणीही नकार देऊ शकत नाही. संध्याकाळी एक कप गरम चहा घेताना असो किंवा रात्री तुमचा आवडता कार्यक्रम पाहताना, जेव्हाही तुम्हाला काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होते वेफर्सशिवाय चांगला पर्याय दुसरा कोणताही असू शकत नाही. तुम्हाला बाजारात विविध प्रकारचे वेफर्स मिळतात. पण घरी तयार केलेले देसी स्नॅक्स खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. देसी स्नॅक्सबद्दल बोलायचे झाल्यास, केळीचे वेफर्स हा असाच एक खाद्यपदार्थ आहे जो दक्षिण भारतात खूप लोकप्रिय आहे. हा स्वादिष्ट स्नॅक त्याच्या पातळ आणि खुसखुशीतपणासाठी ओळखला जातो आणि त्याची देखील चव अप्रतिम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे कुरकुरीत वेफर्स कच्च्या केळीपासून तयार केले जातात आणि त्यांना सोनेरी पिवळसर रंग येईपर्यंत तळले जातात. ते चवीला ते थोडे गोडसर किंवा खमंग असू शकतात आणि अनेकदा त्यावर लाल मिरची पावडर आणि काळी मिरी यांसारखा मसाला घालून तयार केले जातात. आपल्यापैकी बरेच जण हा दक्षिण भारतीय स्नॅक बाजारातून विकत घेण्यास प्राधान्य देत असलो तरी, केळीचे ताजे वेफर्स घरी तयार करता येऊ शकतात. आता तुम्हाला वाटेल की सुरवातीपासून केळीच्या वेफर्स तयार करणयासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की, हा स्वादिष्ट नाश्ता तुम्ही घरी सहज तयार करु शकता? तुम्ही एकदा प्रयत्न करुन तर करुन बघा. येथे आम्ही कुरकरीत केळीच्या वेफर्सची एक साधी रेसिपी दिली आहे

घरच्या घरी कुरकुरीत केळी वेफर्स तयार करण्यासाठी काही टिप्स:

१. योग्य प्रकारची केळी निवडा

योग्य प्रकारची केळी निवणडल्यास तुम्हाला कुरकुरीत केळीचे वेफर्स तयार करण्यासाठी मदत होते. कडक आणि कच्ची केळी निवडा कारण त्यात साखरेचे प्रमाण कमी असते. शक्य असल्यास, नेंद्रन आणि साबा जातींसारख्या स्टार्चियर केळींचे प्रकार मिळवण्याचा प्रयत्न करा.

२. केळीचे पातळ काप करा

केळीचे वेफर्स तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तुम्हाला केळीचे पातळ काप तयार करायचे आहे. ते एकसारख्या आकारमध्ये कापले जातील याची खात्री करा त्यामुळे त्यांना तळण्यासाठी समान वेळ लागेल. जितके पातळ केळीचे काप असतील तितकेच ते कुरकुरीत होतील.

३. केळीचे काप मिठाच्या पाण्यामध्ये भिजवा

केळीचे पातळ काप करुन झाले त्यांना एका भांड्यात मिठाच्या पाण्यामध्ये काही मिनिटे भिजण्यासाठी ठेवा. त्यामुळे त्यातील जास्तीचा स्टार्च निघून जाईल आणि ते एकमेकांना चिकटणार नाहीत.

रविवार स्पेशल: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हरभऱ्याच्या डाळीचे खुशखुशीत वडे, जाणून घ्या सोपी रेसिपी

कुरकरीत केळीचे वेफर्स तयार करण्याची कृती (How To Make Crispy Banana Chips )

सुरवातीला एका भांड्यात हळद, मीठ, आणि केळीचे काप एकत्र करुन घ्या आणि त्यांना ४-५ मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या. आता त्यांना चांगले मिसळा आणि पूर्णपणे निचरा होण्यासाठी चाळणीत घेऊन त्यांना हलवा. कढईत थोडे खोबरेल तेल मध्यम आचेवर गरम करा. थोडे थोडे केळीचे काप तेलात टाकून कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळा. पूर्ण झाल्यावर, पेपर नॅपकिनवर काढून घ्या. वरून थोडे मीठ आणि तिखट टाका आणि थंड होऊ द्या. एका आठवड्यापर्यंत हवाबंद कंटेनरमध्ये साठवा. हवे तेव्हा स्वादिष्ट आणि कुरकुरीत केळीच्या वेफर्स खाण्याचा आनंद घ्या!

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make crispy banana chips know the recipe snk
First published on: 19-03-2023 at 13:39 IST