सध्या श्रावण महिन्यात अनेकजण मोठ्या श्रद्धने उपवास करतात. अशात साबुदाणा खिचडी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही उपवासाला वेगळं काही करू शकता. तुम्ही उकळलेले बटाटे, राजगिरा आणि शिंगाडा पीठापासून दहिवडा बनवू शकता. उपवासासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हा उपवासाचा दहिवडा कसा बनवायचा, यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या. साहित्य उपवासाची भाजणीराजगिरा पीठशिंगाडा पीठउकळलेले बटाटेहिरव्या मिरच्याकोथिंबीरदहीशेंगदाण्याचा कूटजिरेआलेतिखटमीठतूप हेही वाचा : Sabudana Chivda : श्रावणात बनवा टेस्टी साबुदाणा चिवडा, ही रेसिपी नोट करा कृती उकळलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, राजगिरा आणि शिंगाडा पीठ एकत्र करा आणि त्यात तिखट, मीठ टाकाहे पीठ चांगल्याने मळून घ्या.या मिश्रणाचे लहान गोळे करा.कढईत तूप गरम करा आणि हे गोळे तळून घ्या.नंतर एका भांड्यामध्ये दही घ्या.त्यात मिरची, बारीक केलेले आले आणि मीठ घाला.दही चांगले घुसळून घ्या.यात तळलेले गोळे टाका आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकाथोड्या वेळानंतर तुम्ही हा उपवासाचा दहिवडा सर्व्ह करू शकता.