Shev Bhaji Recipe at home : जेवणात त्याच त्यात भाज्या खाऊन कंटाळा आला की एखादा पारंपारीक पदार्थ खावासा वाटतो. फरसाण किंवा शेव आपल्या सर्वांच्याच घरी असतेच. शेवची भाजी हा पारंपारीक पदार्थ खायला चविष्ट, झणझणीत असतो. अनेक ग्रामीण भागात पाहुण्याच्या ताटात शेवची भाजी आवर्जून वाढली जाते. ढाबा स्टाईल शेवभाजी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भन्नाट शेवभाजी बनवणे शक्य आहे. चला तर जाणून घेऊया अशा चटकदार शेवभाजीची रेसिपी.

शेव भाजी साहित्य :

  • जाड शेव, एक वाटी
  • बारीक चिरलेला कांदा एक
  • बारीक चिरलेला टोमॅटो एक
  • आलं, लसूण पेस्ट (एक चमचा)
  • बेडगी मिरची लाल तिखट
  • अर्धा चमचा धने पावडर
  • बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी
  • जिरे, मोहरी
  • हळद, तेल, मीठ

शेव भाजी कृती :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • कढईत तेल तापवून त्या मोहरी आणि जिरे तडतडून घ्या.
  • आता त्यात कांदा आणि टोमॅटो घालून परता.
  • कांदा, टोमॅटो मऊ होण्यास सुरुवात झाल्यावर त्यात आलं, लसणाची पेस्ट घाला.
  • सर्व साहित्य परतल्यावर त्यात हळद,लाल तिखट, निम्मी कोथिंबीर, धने पावडर आणि मीठ घालून एकजीव होईपर्यंत परता.
  • मिक्सरच्या भांड्यात दोन लहान चमचे शेव फिरवून घ्या आणि ती मिश्रणात घाला.
  • सगळयात शेवटी या मिश्रणात दोन वाट्या गरम पाणी गेला.
  • गरम पाणी घातल्याने रश्श्याला लाल तर्री येईल.
  • खायला देताना वाटीत शेव, त्यावर गरम रस्सा आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

हेही वाचा >> चिकन पेक्षाही सरस अशी गट्ट्याची भाजी, एकदा नक्की करून पहा…

  • ही भाजी काही मिनिटात तयार होते. पोळी, भात, रोटी आणि ब्रेडसोबत खाता येते.
  • कोथिंबिरीची सजावट आणखी छान दिसते. ही भाजी पोळी, भाकरीबरोबर खाता येते आणि नुसतीही छान लागते. पाहुणे आल्यास झटपट करण्यासाठी हा पदार्थ नक्की ट्राय करा.