Instant Green Chilli Pickle : तुम्हाला लोणचं खायला आवडतं का? जर तुमचे उत्तर होय असेल तर तुमच्यासाठी ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. कैरीचे लोणचं आपण नेहमी खातो. पण तुम्ही कधी लिंबाचं लोणचं खाऊन पाहिले आहे का? नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे लोणचं तुम्ही झटपट घरच्या घरी केव्हाही बनवू शकता. ज्यांना झणझणीत खायला आवडतं त्यांना ही रेसिरी नक्की आवडेल. जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी हे लोणचं अगदी उत्तम पर्याय आहे. चला तर मग बघू या रेसिपी

मिरचीचं लोणचं रेसिपी

साहित्य
१५० ग्रॅम हिरवी मिरची
१ टीस्पून बडीशेर
१ टीस्पून जिरे
१/२ टीस्पून मेथी दाना
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हळदी
१/२ टीस्पून काश्मिरी मिरची
हिंग
१ टीस्पून कलोंजी
चवीनुसार मीठ
३ चमचे मोहरीचे तेल
१/२ लिंबू

हेही वाचा – तांदूळ न भिजवता कशी बनवावी तिप्पट फुलणारी शुभ्र कुरडई! नोट करा ‘ही’ वाळवणाची सोपी रेसिपी

कृती

१) मिरच्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचे देठ काढून मधोमध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२) एका भांड्यात जिरे, बडीशेप, मेथी दाणे, मोहरी टाकून चांगली भाजून घ्या.
३) त्यानंतर एक मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
४) एका कढईत तेल गरम करा.
५) चिरलेल्या मिरच्यांमध्ये तिखट. हळद, मीठ, हिंग कलोंजी आणि जिरे, बडीशेप, मेथी दाणे, मोहरीची पावडर टाका
६) त्यात गरम झालेले तेलाची टाकून सर्व मिश्रण चांगले एकत्रक करून घ्या. त्यात लिंबू पिळा आणि एकत्र करा.
७) मिरचीचे लोणचं तयार आहे.
८) हवा बंद काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरुन ठेवा.