बेसन पीठ तर प्रत्येकाच्या घरात असते. बेसनाच्या पिठापासून पोळा, पिठलं, झुणका, भजी आदी विविध पदार्थ बनवले जातात. तर आज बेसन पीठ वापरून मिक्स भाज्यांचे ऑमलेट तयार करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर एका युजरने या रेसिपीचा सोपा व्हिडीओ शेअर केला आहे.युजरने याला टोमॅटो ऑमलेट म्हंटल आहे. पण, तुम्ही याला मिक्स भाज्यांचे व्हेज ऑमलेट सुद्धा तुम्ही म्हणू शकता. चला तर पाहूयात या स्वादिष्ट आणि हेल्दी पदार्थाची सोपी रेसिपी.

साहित्य :

बेसन, काकडी, दुधी, सिमला मिरची, गाजर (किंवा तुमच्याकडे असलेली कोणतीही भाजी), तांदळाचे पीठ, ओवा आणि जिरा पावडर, मसाले, कोथिंबीर, हिरवी मिरची, पाणी, मीठ.

हेही वाचा…शिरा, उपमा खाऊन कंटाळलात? तर पोटभर नाश्त्यासाठी ‘रवा टोस्ट’ बनवून पाहा…

कृती :

  • एका भांड्यात बेसन घ्या. काकडी, दुधी, सिमला मिरची, गाजर यांचा बारीक केलेला किस घाला. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर घाला.
  • नंतर त्यात तांदळाचे पीठ, ओवा आणि जिरा पावडर, हळद, लाल तिखट, मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या व त्यात थोडं पाणी घाला व बॅटर तयार करून घ्या. नंतर तुमच्या आवडीनुसार हे बॅटर आप्पे किंवा इडलीच्या भांड्यात घाला व त्यावर झाकण ठेवा.
  • काही वेळात तुमचे हेल्दी, स्वादिष्ट ‘मिक्स भाज्यांचे ऑमलेट’ तयार.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @iampurvishah या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा पदार्थ तुम्ही फक्त नाश्त्यालाच नाही तर रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता.