बाजारातून कोबी आणल्यानंतर तुम्ही त्याची नेहमीसारखी भाजी करायचा विचार करत आहात का? मग जरा थांबा आणि कोबी वापरून सुंदर कोफ्ता करी कशी बनवायची ते पाहा. कोबीच्या भाजीचा हा प्रकार पाहून, मुलंदेखील अगदी आनंदाने आणि आवडीने ही भाजी खातील. चला तर मग कोबी कोफ्ता करी कशी बनवायची ते पाहू.

कोबी कोफ्ता करी रेसिपी

साहित्य

तेल
पाणी
कोबी
टोमॅटो
कांदा
हिरवी मिरची
कोथिंबीर
आले
आले-लसूण पेस्ट
काजू
मीठ
हळद
लाल तिखट
धणे पावडर
बेसन
हिरवी आणि काळी वेलची
दालचिनी
लवंग
जिरे
तमालपत्र
गरम मसाला
कसुरी मेथी

हेही वाचा : Recipe : ‘अशी’ खास मटार उसळ एकदा बनवून पाहाच! पाच मिनिटांत होईल सगळ्याचा चट्टामट्टा…

साहित्याची एवढी मोठी यादी पाहून अजिबात घाबरू नका. रेसिपी बनवण्यासाठी सोपी आहे.

कृती

  • सर्वप्रथम एक कांदा, दोन टोमॅटो, ३-४ हिरव्या मिरच्या, ८-१० काजू, आले आणि थोडे लाल तिखट मिक्सरच्या भांड्यात घालून, थोडेसे पाणी घालून सर्व पदार्थांना वाटून त्याची एक पेस्ट बनवून घ्या. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.
  • आता एका बाऊलमध्ये किसलेला कोबी घ्यावा. त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, धणे पावडर घालून घ्या. तसेच यामध्ये अर्धा कप बेसन आणि तुमच्या आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या. आता सर्व पदार्थ छान मळून घ्या. तयार कोबीच्या मिश्रणाचे लहान-लहान गोळे म्हणजेच कोफ्ते बनवून घ्या.
  • गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये कोफ्ते तळण्यासाठी तेल तापत ठेवा. तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले कोबीचे कोफ्ते सोडून खरपूस तळून घ्यावे. आपले कोबीचे कोफ्ते तयार आहेत. या कोफ्त्याची करी कशी बनवायची ते पाहू.

हेही वाचा : व्यक्तींच्या आवडत्या पदार्थांवरून ओळखा त्यांचा स्वभाव! पाणीपुरी-वडापाव काय सांगतात तुमच्याबद्दल, पाहा

  • करी बनवण्यासाठी, एका पॅनमध्ये थोडे तेल घालून ते तापू द्यावे. त्यामध्ये २ हिरव्या वेलची, २ लवंग आणि २ तमालपत्र घाला. तसेच १ काळी वेलची, १ दालचिनी आणि १ चमचा जिरे घालून सर्व खडे मसाले चांगले मिनिटभर परतून घ्या.
  • आता यामध्ये तयार केलेली कांदा-टोमॅटोची पेस्ट घालून घ्या. ही पेस्ट १० ते १२ मिनिटे मस्त परतून घ्यावी. या पेस्टला तेल सुटू लागल्यावर त्यामध्ये २ कप गरम पाणी घालून तयार होणाऱ्या करीमध्ये १ चमचा गरम मसाला आणि १ चमचा कसुरी मेथी घालून घ्या. आता यामध्ये तयार केलेले कोबीचे कोफ्ते आणि चवीसाठी मीठ घालून सर्व पदार्थ ढवळून घ्या.
  • तयार होणारी कोबी कोफ्ता करी १५ मिनिटे झाकून शिजवून घ्यावी. सर्वात शेवटी करीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या.

तयार आहे आपली स्वादिष्ट आणि सर्वांना आवडणारी अशी ‘कोबी कोफ्ता करी’.

View this post on Instagram

A post shared by Sagar Kumar (@sagarskitchenofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @sagarskitchenofficial नावाच्या अकाउंटने ही भन्नाट रेसिपी शेअर केली आहे. या रेसिपी व्हिडीओला आत्तापर्यंत १.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.