यंदाचा उन्हाळा जवळपास संपत आला आहे. मात्र, तरीही उन्हाळी पदार्थ आणि त्याच्या रेसिपी या करण्यासाठी म्हणू तितक्या कमीच आहेत. कैरीचे पन्हे, लोणचे, सार, मसाला कैरी, तक्कू असे कितीतरी पदार्थ आपण साधारण मार्च ते मे या उन्हाळी वातावरणात बनवत असतो. काही जण वर्षभर टिकून राहतील अशी बरणीभर तिखट, गोड लोणची बनवून ठेवतात. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला ते जमतेच असे नाही.

मात्र, आज आपण कैरीचा अगदी १० मिनिटांमध्ये तयार होणारा असा एक अतिशय चटपटीत पदार्थ कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हा पदार्थ म्हणजे कैरीचा तक्कू. अगदी मोजक्या साहित्यात तयार होणाऱ्या कैरीच्या तक्कूला काही जण किसलेल्या कैरीचे लोणचे असेदेखील म्हणतात. तसेच हा पदार्थ बनवण्याच्या अनेक पद्धती असल्याचे vmiskhadyayatra103 या यूट्यूब चॅनेलमधून समजते. मात्र, कैरीच्या तक्कूची ही रेसिपी अतिशय झटपट आणि किमान आठवडाभर टिकणारी आहे. चला, चटपटीत उन्हाळी पदार्थाची झटपट तयार होणारी रेसिपी पाहू.

Smoke biscuit injurious to heart observation in krims hospital study
नागपूर: नवीन ‘फॅड’! तोंडातून धूर सोडणारी बिस्किटे…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
commuters demand refunds over cancellations of ac local train due to technical glitch
आमचे पैसे परत द्या! वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांतील पासधारक प्रवाशांची मागणी
Heavy rain Maharashtra, rain Maharashtra news,
आजपासून चार दिवस मूसळधार पावसाचे
panvel water latest marathi news
पनवेलमधील पाणी पुरवठा बंद
polaris dawn mission
अवकाशातील उंच भरारी…
Gelatin used for sweets jams jellies candies will be made from boiler chicken waste Nagpur
मिठाई, जाम, जेली, कँडीसाठी वापरले जाणारे ‘जिलेटीन’ आता बॉयलर कोंबडीच्या वेस्टपासून बनणार…
dark chocolate cinnamon coffee and green tea enough to reduce blood sugar
Blood Sugar : ग्रीन टी, डार्क चॉकलेट, दालचिनीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते का? काय खरं काय खोटं? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

कैरीचा तक्कू रेसिपी :

साहित्य

तेल
कैरी
लाल तिखट
मीठ
मोहरी
हिंग
हळद
मोहरी पावडर
मेथी पावडर

कृती

  • सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून आणि सोलण्याने सोलून घ्यावे.
  • आता ही सोलून घेतलेली कैरी किसणीच्या मदतीने छान किसून घ्यावी.
  • किसलेली कैरी एका बाऊलमध्ये काढून घ्यावी.
  • आता एका लहानशा भांड्यामध्ये या तक्कूसाठी फोडणी करून घेऊ.
  • फोडणी करताना साधारण दोन चमचे तेल तापवून घ्यावे.
  • तेल तापल्यानंतर त्यामध्ये १ चमचा मोहरी, १ चमचा जिरे, १ चमचा हिंग घालून फोडणीच्या भांड्याखालील गॅस बंद करून घ्यावा.
  • गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद, अर्धा चमचा मेथी पावडर आणि थोडी मोहरी पावडर घालून घ्यावी.
  • आता किसून घेतलेल्या कैरीवर एक ते दीड चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालून कैरीचा किस ढवळून घ्यावा.
  • आता तयार केलेली फोडणी बाउलमधील कैरीवर चमच्याच्या मदतीने टाकून घ्या. तुमच्या आवश्यकतेनुसार फोडणी कैरीत घालण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता.
  • शेवटी पुन्हा एकदा कैरीचे सर्व मिश्रण ढवळून घ्या.
  • तयार आहे आपला उन्हाळ्यातील तोंडी लावणीसाठी चटपटीत असा कैरीचा तक्कू.
  • हा पदार्थ व्यवस्थित साठवून ठेवल्यास साधारण आठ दिवस टिकून राहू शकतो.

टीप :

तक्कूसाठी तयार केलेली फोडणी गार झाल्यावर किंवा कोमट झाल्यावर कैरीवर टाकावी. तेलाची कडकडीत गरम फोडणी या पदार्थाला देऊ नये.
तुमच्या आवडीनुसार कैरीमध्ये तिखटाचे आणि फोडणीत तेलाचे प्रमाण कमी किंवा अधिक करावे.

व्हिडिओ पाहा :

चटपटीत अशा या कैरीच्या तक्कूची रेसिपी यूट्यूबवरील vmiskhadyayatra103 नावाच्या चॅनेलने शेअर केली आहे.