मसूर ही एक पौष्टीक डाळ म्हणून ओळखली जाते. चांगल्या आरोग्यासाठी मसूर डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. मसूर डाळीचे सेवन केल्याने ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते याशिवाय हाडे मजबूत राहतात. आज आपण मसूर पासून बनवणारे वीगन सूप घरी कसे बनवायचे, या विषयी जाणून घेणार आहोत.
साहित्य –
- १ मोठा चमचा शेंगदाणा तेल
- १ मोठा चमचा बारीक कापलेले आले
- १ लवंग लसूण
- १ चिमटी मेथीचे दाणे
- १ कप कोरडे लेन्टिल (मसूर)
- १ कप स्क्वॅश केलेले बटरनट क्यूब्स
- एक तृतियांश कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- २ कप पाणी
हेही वाचा :
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
- अर्धा कप नारळ दूध
- २ मोठे चमचे टोमॅटो पेस्ट
- १ चिमूट लाल मिरची
- १ चिमूट जायफळ पूड
- चवीनुसार मीठ आणि मिरपूड
हेही वाचा :
कृती –
- मध्यम गॅसवर मोठ्या भांड्यात तेल तापवून त्यात कांदा, आले, लसूण आणि मेथी शिजवा.
- त्यानंतर त्यात मसूर, स्क्वॅश केलेले बटरनट आणि कोथिंबीर टाका.
- त्यात पाणी, नारळाचे दूध आणि टोमॅटो पेस्ट टाका व नीट ढवळून घ्या.
- त्यानंतर कढीपत्ता, लाल मिरची, जायफळ, चवीनुसारमीठ आणि मिरपूड टाका व ढवळून घ्या.
- हे मिश्रण ३० मिनिटे उकळू द्या. गरम गरम सूप प्यायला द्या.