विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. कढईतील रोडगे…चला तर मग पाहुयात चमचमीत आणि तितकाच चवदार विदर्भ स्पेशल कढईतील रोडगे…

विदर्भ स्पेशल कढईतील रोडगे साहित्य

  • २ कप गव्हाची कणीक
  • १/४ कप बारीक रवा (गव्हाची कणीक जर रवाळ असेल तर त्यात रवा मिक्स करण्याची गरज नाही)
  • १/२ टेबलस्पून जीरे
  • १/२ टीस्पून ओवा
  • १/२ टेबलस्पून मीठ
  • २-३ टेबलस्पून तेल / तूप(कणकेत मिक्स करण्यासाठी)
  • १/४ कप तुप/ तेल (चपात्या ला लावण्यासाठी)
  • कोमट पाणी आवश्यकतेनुसार

विदर्भ स्पेशल कढईतील रोडगे कृती

स्टेप १

परातीत गव्हाची कणीक घ्यावी. त्यामध्ये वरील सर्व साहित्य घालावे. (कणीक जर रवाळ असेल तर त्यात रवा मिक्स करण्याची गरज नाही.) चांगले मिक्स करून घ्यावे. व थोडे थोडे पाणी घालून घट्टसर कणकेचा गोळा तयार करून घ्यावा. व अर्धा तास बाजूला ठेवून द्यावे.

स्टेप २

अर्ध्या तासानंतर परत कणीक चांगली मळून घ्यावी व त्याचे समान गोळे करून ठेवावे.
त्यातील एक गोळा घ्यावा. त्या एका गोळ्याचे दोन समान भाग करावे. त्या दोन गोळ्या मधून एका गोळ्याचे एक छोटा व एक मोठा असे दोन कणकेचे गोळे तयार करावे.

स्टेप ३

आता सर्वात मोठा गोळ्याची जाडसर चपाती लाटून घ्यावी. आता या मोठ्या चपाती पेक्षा लहान चपाती लाटून घ्यावी. व अजून एक लहान चपाती लाटावी.

स्टेप ४

सर्वात मोठी चपाती घेऊन त्यावरती चांगले तूप लावून घ्यावे. कणिक भुरभुरून घ्यावी व चांगली पसरवून, त्यावरती दुसरी चपाती ठेवावी. वरती जी प्रोसेस केली तीच आता परत करावी. असे एकावर एक चपाती ठेवून त्यावरी तुप लावुन पिठ भुरभुरून घ्यावे. व त्याला फोटोत दाखवीले तसे एकत्र करून रोडग्यासाठी गोळा तयार करून घ्यावा.

स्टेप ५

बाकीचेही गोळे असेच तयार करून ठेवावे. आता गॅस वरती कढई ठेवावी. त्यामध्ये मीठ घालावे. व त्यात स्टॅन्ड ठेवावे. व या स्टॅन्ड वरती एक प्लेट ठेवावी. फ्लॅटला थोडे तूप लावून घ्यावे. वरती झाकण ठेवून, कढई फ्री-हीट करून घ्यावी.

स्टेप ६

कढई प्री-हीट झाली की त्यामध्ये आता हे तयार गोळे ठेवावे. वरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे मिडीयम टू लो फ्लेम वरती हे रोडगे होऊ द्यावे. पंधरा मिनिटानंतर चेक करून घ्यावे. बाजू पलटवून परत दहा मिनिटे शिजवून घ्यावीत. जवळजवळ 30 ते 40 मिनिटे हे रोडगे तयार होण्यासाठी लागतात. अशाच प्रकारे बाकीचे ही रोडगे तयार करून घ्यावे.

हेही वाचा >> डोकेदुखीसह अनेक आजारांना पळवून लावणारी रानभाजी करटोली, ही भन्नाट रेसिपी करून तर बघा…

स्टेप ७

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता हे तयार रोडगे वांग्याच्या भाजी सोबत किंवा तुरीच्या डाळीच्या वरणा सोबत, मिरचीच्या ठेच्या सोबत सर्व्ह करावे. नुसते रोडगे देखील खायला खूप चांगले लागतात..तेव्हा नक्की ट्राय करा विदर्भ स्पेशल कढईतील रोडगे