scorecardresearch

Premium

घरीच बनवा अस्सल झणझणीत खानदेशी काळा मसाला, अर्धा किलोच्या प्रमाणात…जाणून घ्या सोपी मराठी पद्धत

Khandeshi Kala Masala easy recipe: झणझणीत काळा मसाला रेसिपी नक्की ट्राय करा

Khandeshi kala masala Recipe In Marathi
खानदेशी काळा मसाला मराठी रेसिपी (फोटो: युट्युब/ @ @YogitasKitchen वरून साभार)

काळा मसाला हा सर्वप्रथम खानदेशमध्ये बनवण्यात आला होता आणि हा मसाला त्या ठिकाणी कोणत्याही तिखट भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. काळा मसाला हा मुख्यता आमटी मध्ये किंवा सांबर मध्ये घातला जातो आणि त्याची चव वाढवली जााते. चला तर पाहुयात अस्सल झणझणीत खानदेशी काळा मसाला सोपी रेसिपी..

खानदेशी काळा मसाला साहित्य

breakfast from wheat flour
Breakfast Recipe : गव्हाच्या पिठापासून बनवा सकाळी झटपट नाश्ता, लगेच ही सोपी रेसिपी नोट करा
khushboo tawde and Sangram Salvi first met not Devyani serial set
“मला हा अजिबात आवडला नव्हता…”, खुशबू तावडे व संग्राम साळवीची ‘अशी’ झाली होती पहिली भेट; ‘देवयानी’ मालिकेच्या सेटवर नव्हे तर…
Homemade Garam Masala Recipe In Marathi Special Garam Masala
घरीच बनवा पाव किलोच्या अचूक प्रमाणात “गरम मसाला”; जाणून घ्या सोपी मराठी पद्धत
kala masala recipe in marathi
घरीच बनवा अस्सल झणझणीत काळा मसाला, १ किलोच्या प्रमाणात…जाणून घ्या सोपी मराठी पद्धत
 • सुक खोबरं पाव किलो धणे पाव किलो
 • मिरी २५ ग्रॅम
 • लवंग ६ ग्रॅम दालचिनी १२ ग्रॅम
 • बदाम फूल १२ ग्रॅम नाकेश्र्वर ६ ग्रॅम
 • सुंठ १२ ग्रॅम रामपत्री १२ ग्रॅम
 • जायपत्री १२ ग्रॅम हिरवी वेलची ६ ग्रॅम
 • शहाजीरे १२ ग्रॅम जिरे २५ ग्रॅम
 • बडीशेप १२ ग्रॅम तेज पत्ता १२ ग्रॅम
 • दगड फूल १२ ग्रॅम मसाला वेलची ६ ग्रॅम
 • हिंग २५ ग्रॅम हळद २५ ग्रॅम
 • जायफळ अर्धे
 • खसखस २५ ग्रॅम

खानदेशी काळा मसाला कृती :

 • सर्वात आधी वर दिलेलं सर्व साहित्य वेगवेगळं छान भाजून घ्या. यावेळी तेल वापरु नये. खोलगट कढईत हे सर्व साहित्य खमंग भाजून घ्या.
 • सर्व मसाले भाजल्यानंतर ते थंड होण्यासाठी एका पेपरवर पसरवून घ्या.
 • सर्व मसाले थंड झाल्यानंतर मिक्सररमध्ये बारिक करुन घेणे. मिक्सरला मसाले बारीक करुन झाल्यावर चाळणीनं चाळून घ्यायचे आहेत.लक्षात ठेवायचं आहे की खोबरं वेगळ बारीक करुन बाजूला ठेवायचं आहे.
 • मसाले चाळून झाल्यानंतर खोबरं बारीक करायचं आहे. खोबऱ्याला बऱ्यापैकी तेल सुटत असल्यामुळे खोबरं बारीक केल्यावर ते पातळंस होतं.

हेही वाचा >>

 • आता खोबरं आणि बारीक केलेली मसाला पावडर हातानं छान एकत्र एकजीव करुन घ्या
 • हा मसाला एका स्वच्छ बरणीत भरुन ठेवल्यास वर्षभर चांगला राहतो. तुम्हीही हा मसाला नक्की ट्राय करा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Khandeshi kala masala recipe in marathi ingredients list in marathi marathwada kala masala easy recipe srk

First published on: 30-11-2023 at 15:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×