Viral Video : सध्या उन्हाळा सुरू आहे. सगळीकडे वाळवण सुरू आहे. वाळवण ही परंपरा महाराष्ट्रात खूप पूर्वीपासून दिसून येते.घरोघरी महिला वर्षभराच्या शेवया, कुरडई, पापड तयार करताना दिसतात. उन्हाळा म्हणजे आंब्याचा काळ. आमरस हा तर आवडीने केला जातो आणि आमरसाबरोबर कुरडई असेल तर खाण्याचा आनंद दुप्पट होतो. कुरडईमध्ये अनेक प्रकार दिसून येतात. काही लोक गव्हापासून तर काही लोक तांदळापासून कुरडई करतात. कुरडई तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा तितकीच आगळी वेगळी आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला कुरडई तयार करताना दिसताहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये महिला गरम पाण्यामध्ये गव्हाचा चीक टाकताना दिसत आहे. गाठी होऊ नये म्हणून महिलांसह काही पुरुष मंडळी सुद्धा सतत चीक परतून घेताना दिसत आहे.गव्हाचा चिक शिजल्यानंतर महिला सोऱ्यामध्ये छोटे छोटे गोळे भरून त्याच्या कुरडई तयार करताना दिसतात. त्या कुरडई ताटावर काढतात आणि नंतर उन्हामध्ये वाळवताना दिसतात. व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या आई किंवा आजीची आठवण येईल तर काही लोकांना गावाकडची आठवण येईल.
हेही वाचा : विदर्भातील लोकप्रिय डाळभाजी कधी खाल्ली का? पंगतीत वाढली जाते, रेसिपीचा VIDEO एकदा पाहाच
पाहा व्हिडीओ
f4foodi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅ्प्शनमध्ये लिहिलेय, “महाराष्ट्रीयन स्पेशल कुरडई” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही आहे आपली संस्कृती” तर एका युजरने लिहिलेय, “काय भाव आहे.. जर विकत असाल तर आणि कुठे भेटेल” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझ्या घरी आजही मावशी, मामी, आई, आजी ताई, अगदी सर्वच नातेवाईक पुष्कळ प्रमाणात गव्हाच्या कुरडई, पापड, गव्हाच्या शैवया, साबुदाणे पापड, साबुदाणे चकली, वेफर्स, लाल तिखट मसाला (चटणी) वर्षभर पुरेल इतकी स्टील टाक्या भरून बनवतात. खूप खूप मेहनत लागते ते सर्व बनवण्यासाठी महिनाभर सर्व दमून जातात, नंतर संपूर्ण घर स्वच्छ करून ठेवतात. व्हिडीओ पाहून, मला माझं संपूर्ण लहानपण आठवलं”