Mix Dal Tadka Recipe: अनेकांच्या घरात रोज डाळ बनवली जाते. पण सतत एकाच पद्धतीने बनवलेली डाळ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही ढाबा स्टाईल मिक्स डाळ नक्की ट्राय करा. ही डाळ घरात प्रत्येकाला आवडेल. चला तर मग जाणून घेऊया मिक्स डाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती…

मिक्स डाळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

२ कप तूर डाळ
३ चमचे मूग डाळ
३ चमचे मसूर डाळ
१ चमचा आलं-लसूण पेस्ट
१/२ वाटी कढीपत्याची पाने
१/२ वाटी कोथिंबीर
२ कांदे लांब चिरलेला
२ टोमॅटो बारीक चिरलेले
२ चमचे मिक्स मसाला
१/४ चमचे हळद
२ सुक्या लाल मिरच्या
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धणे पूड
१ चमचा तेल
१ चमचा बटर
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
१/४ चमचा हिंग
पाणी (प्रमाणानुसार)
चवीनुसार मीठ

मिक्स डाळ बनवण्याची कृती:

सर्वात आधी एका कुकरमध्ये हळद आणि हिंग घालून सर्व डाळी शिजवून घ्या.

ही शिजलेली मिक्स डाळ एका भांड्यामध्ये काढून ठेवा.

आता फोडणी तयार करण्यासाठी पॅनमध्ये तेल आणि बटर एकत्र गरम करा.

त्यानंतर त्यात मोहरी, जिरं, सुक्या लाल मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, कढीपत्ता घालून फोडणी द्या.

आता या फोडणी कांदा, टोमॅटो आणि मीठ घाला.

त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट काही वेळ परता आणि त्यात शिजवलेली डाळ घाला.

डाळ आणि तडका एकजीव झाल्यानंतर त्यात तुम्हाला हवे तितके पाणी घाला आणि डाळ चांगली उकळवून घ्या.

हेही वाचा: असे बनवा अस्सल मालवणी पद्धतीने वांग्याचे भरीत; नोट करा साहित्य आणि कृती

आता पुन्हा दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात जिरे पावडर, धणे पावडर आणि मीठ घाला चांगले मिसळा आणि फोडणीच्या वरून डाळीवर घाला.

यानंतर डाळीवर कोथिंबीर घालून झाकण ठेवून डाळ काही वेळ तशीच ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरमागरम ढाबा स्टाईल मिक्स डाळ भातासह सर्व्ह करा.