चपाती हा असा पदार्थ आहे जो आपल्याकडे जवळपास प्रत्येक घरामध्ये तयार केला जातो. सकाळ, दुपार, रात्री तिन्ही वेळेच्या आहारात चपातीचा समावेश हा आर्वजून केला जातो. अशावेळी कित्येकदा चपात्या शिल्लक राहतात. मग इच्छा नसतानाही शिळ्या चपात्या टाकून द्याव्या लागतात. शिळी चपाती टाकून देण्याऐवजी तुम्ही त्यापासून काही पदार्थ तयार करू शकता तेही झटपट. आतापर्यंत तुम्ही फोडणीची पोळी, गुळ – तूप घालून लाडू, हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण आपणा कधी शिळ्या चपात्यांचे डोसे खाल्ले आहेत का? चला तर मग जाणून घेऊयात चपात्यांपासून कुरकुरीत आणि झटपट डोसे कसे तयार करावे.

डोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

  • चपाती
  • रवा
  • दही
  • मीठ
  • तेल

डोसे बनवण्यासाठी कृती –

  • सर्वप्रथम, शिळ्या चपात्यांचे तुकडे करा, व हे तुकडे एका ताटात किंवा वाटीत घ्या. यात पाणी मिसळून १० मिनिटांसाठी झाकण ठेऊन काही वेळ भिजत ठेवा. यामुळे चपात्या मऊ होतील.
  • १० मिनिटं झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्या, त्यात पाण्यासकट भिजलेली चपाती, एक कप रवा, अर्धा कप दही घालून मिक्सरमधून वाटून घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर एका वाटीत काढून घ्या. त्यात एक चमचा मीठ घालून मिक्स करा.
  • आता नॉन स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवा, थोडे तेल लावून पसरवा. व त्यावर तयार चपातीचं बॅटर पसरवून डोसा तयार करा. व दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Karishma Sayyad (@karishmas_mejwani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Shravan Special 2023 : श्रावणात बनवा उपवासाचा मेदू वडा, फक्त १ वाटी भगर घ्या अन् बनवा कुरकुरीत मेदू वडा

  • अशा प्रकारे शिळ्या चपातीचा डोसा खाण्यासाठी रेडी आहे. आपण हा डोसा चटणीसोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकता.