थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाकडे त्याच्या आवडीचे, शरीराला उब आणि आराम देणारे असे काही ठराविक पदार्थ असतात. काहींना मऊ डाळ खिचडी आवडते तर काहींना मॅगी, सूप सारखे पदार्थ किंवा चहा, कॉफी ही पेय पिण्यासाठी आवडतात. या पदार्थांमध्ये सध्या सर्व तरुण मंडळींमध्ये ‘हॉट चॉकलेट’ हा पदार्थ फारच आवडीचा झाला आहे. मस्त गरम, थोडं घट्ट, पण अतिशय सिल्की लागणारे हे हॉट चॉकलेट आपण कोणत्याही कॅफेमध्ये किंवा कॉफी शॉपमध्ये गेलो की त्यांच्या मेन्यू कार्डमध्ये शोधतो.
पण, जेव्हा आपण हा पदार्थ घरी बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र कधी त्याला फारच दुधाळ चव येते किंवा ते हवं तितकं घट्ट होत नाही. असे जर तुमच्यासोबतही होत असेल, तर घरी हॉट चॉकलेट बनवताना या काही महत्वाच्या गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला हवी. या अतिशय सोप्या आणि सहज लक्षात ठेवता येणाऱ्या टिप्स असून, पुढच्यावेळेस जेव्हा घरी हॉट चॉकलेट बनवाल तेव्हा ते अगदी बाहेर मिळते त्याप्रमाणे बनण्यास मदत होतील.

घरी घट्ट आणि स्मूथ हॉट चॉकलेट बनवण्याच्या पाच टिप्स पाहा

१. पूर्ण फॅट्स असलेले दूध वापरावे

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

घरी हॉट चॉकलेट बनवण्यासाठी कायम फूल फॅट असलेले दूध वापरावे. कारण या दुधात फॅट्स जास्त असल्याने हा पदार्थ बाहेर मिळतो अगदी तसा घट्ट आणि स्मूथ बनण्यास मदत होते.

हेही वाचा : Recipe : ‘या’ कंदमुळापासून बनवा आंबट गोड लोणचं; रेसिपी काय आहे पाहा….

२. चॉकलेटची निवड

तुम्ही हॉट चॉकलेट बनवताना त्यामध्ये कोणत्या चॉकलेटचा वापर करता याला फार महत्त्व असते. त्यामुळे कायम उच्च प्रतीचे डार्क चॉकलेट किंवा ज्यामध्ये कोकोचे प्रमाण जास्त असेल अश्या चॉकलेटचा उपयोग करावा. जितके चॉकलेट डार्क असेल, म्हणजेच चॉकलेटमधील कोकोचे प्रमाण जेवढे जास्त तेवढेच तुमचे हॉट चॉकलेट घट्ट आणि क्रिमी होते.

३. व्हीप क्रीमचा वापर

व्हीप क्रीम कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यास मदत करते. त्यामुळे तुमच्या हॉट चॉकलेटमध्ये थोडे व्हीप क्रीम घालून बनवल्यास ते अतिशय स्मूथ, क्रिमी आणि घट्ट होऊ शकते किंवा तुम्ही हॉट चॉकलेट तयार झाल्यानंतर त्यावर सजावटीसाठीदेखील याचा वापर करू शकता.

४. कंडेन्स्डमिल्कचा वापर

प्रत्येकाच्या घरात साखर ही असतेच. त्यामुळे सहाजिकच हॉट चॉकलेट बनवताना साखरेचा वापर केला जातो. परंतु तसे न करता, या पदार्थासाठी कंडेन्स्डमिल्कचा वापर करावा. कंडेन्स्डमिल्क हे मुळातच घट्ट आणि गोड असल्याने या पदार्थाचा घट्टपणा वाढून हॉट चॉकलेट अतिशय सिल्की, मुलायम होण्यास मदत होते. त्याचसोबत पदार्थाची चव वाढण्यासाठीसुद्धा मदत होते.

हेही वाचा : Recipe : वरणाला द्या राजस्थानी तडका; झटपट तयार होणाऱ्या आंबट-गोड डाळीची रेसिपी पाहा….

५. हॉट चॉकलेट उकळणे महत्वाचे

कोणताही पदार्थ बनवताना घाई करून अजिबात चालत नाही. त्यामुळे अर्थात हा पदार्थ बनवतानादेखील घाई करू नका. हॉट चॉकलेट व्यवस्थित उकळले तरच ते बाहेर मिळते तसे बनण्यास मदत होईल. त्यामळे हॉट चॉकलेटमध्ये घातलेले सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र होऊन उकळले गेले आहेत ना याची खात्री करा आणि मगच गॅस बंद करून ते पिण्यासाठी घ्यावे.

हॉट चॉकलेटची रेसिपी थोडक्यात पाहा

साहित्य

पूर्ण फॅट्सचे दूध
डार्क चॉकलेट
कोको पावडर
कंडेन्स्डमिल्क
दालचिनी
व्हॅनिला इसेन्स

कृती

एका पातेल्यात दूध ओतून घेऊन ते गॅसवर उकळण्यासाठी ठेवावे. त्यामध्ये वितळवलेले डार्क चॉकलेट घालून घ्या. त्यानंतर, कंडेन्स्डमिल्क, कोको पावडर, दालचिनीची काडी आणि व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब घालून सर्व पदार्थ व्यवस्थित ढवळून घ्यावे. यामध्ये कोको पावडरच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर हे सर्व पदार्थ व्यवस्थित उकळून घ्यावे. आता तयार हॉट चॉकलेट ग्लासमध्ये काढून घेऊन, त्यावर व्हीप क्रीम घालून सजावट करा.