सध्या प्रचंड कडक ऊन आणि वाढते तापमान याचा सगळ्यांनाच भयंकर त्रास होऊ लागला आहे. अशा उन्हामुळे आपल्याला सतत तहान लागते; काहीतरी थंडगार खावेसे किंवा प्यावेसे वाटते. मात्र दररोज आईस्क्रीम खाणे किंवा सरबतं पिणे हे काही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरत नाही. मग उन्हाळा सुकर करण्यासाठी आपण काय बरं करू शकतो?

उन्हाळ्यात पाण्याची तहान आणि गारेगार खाण्याची हौस भागवणारे अनेक पौष्टिक आणि चांगले पदार्थ आपल्याकडे आहेत. जसे कि काकडी, कलिंगड, कांदा वैगैरे. बरेचजण उन्हाळ्यात जेवताना हमखास कांदा किंवा काकडी खातात. मात्र आता मधल्यावेळेत ‘टाईमपास’ खाण्यासाठीही तुम्ही काकडीचे चाट बनवून खाऊ शकता.. या थंडगार आणि उष्णता कमी करणारे काकडी चाट कसे बनवायचे याची अत्यंत साधी आणि मजेशीर रेसिपी इन्स्टाग्रामवरील bhannat_swaad नावाच्या अकाउंटने शेअर केली आहे ती पहा.

हेही वाचा : Summer drink : उन्हाळ्यात थंडावा देईल ‘हे’ हिरवेगार सरबत! ‘या’ फळाचा करा वापर

काकडी चाट रेसिपी

मुख्य स्टोरी

साहित्य

काकडी
काकडी
टोमॅटो
जिरे पावडर
मीठ
तिखट
ओरिगानो
चाट मसाला
शेव
कोथिंबीर

हेही वाचा : फक्त १० मिनिटांत बनवा कॅफेसारखी फेसाळ Cold coffee! गाळण्याचा ‘असा’ वापर करून पाहा

कृती

सर्वप्रथम मध्यम आकाराच्या काकड्या स्वच्छ धुवून सोलाण्याच्या मदतीने सोलून घ्यावी.
आता एक कांदा बारीक चिरून घ्या. तसेच टोमॅटोदेखील बारीक चुकरून घ्यावा.
सोलून घेतलेल्या काकडीला मधोमध उभे चिरून घ्यावे.
आता उभ्या चिरलेल्या काकड्यांमधील बिया आणि गर असलेला भाग एका चमच्याच्या मदतीने हलक्या हाताने खरवडून काढून घ्या. काकडीमध्ये पोकळ खोलगट भाग तयार झाला होईल.
आता काकडीच्या खरवडून काढलेला गर सुरीच्या मदतीने बारीक करून घ्या. त्याचबरोबर कोथिंबीरदेखील चिरून घ्यावी.
एका बाऊलमध्ये काकडीचा बारीक केलेला गर, टोमॅटो, कांदा, आणि कोथिंबीर अशा सर्व गोष्टी एकत्र करून घ्या.
त्यामध्येचे थोडेसे मीठ, जिरे पूड घालून बाऊलमधील मिश्रण चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे.
आता काकडीमध्ये तयार केलेल्या खोलगट भागावर थोडेसे मीठ, तिखट, ओरिगानो घालून घ्या आणि त्यावर बाऊलमधील कांदा, टोमॅटोचे मिश्रण घालून घ्यावे.
सर्वात शेवटी काकडीवर थोडी बारीक शेव आणि कोथिंबीर भुरभुरवून घ्या.
उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारे खास थंडगार काकडी चाट तयार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंस्टाग्राम या सोशल मीडियावरील @bhannat_swaad नावाच्या अकाउंटवरून चाटची ही भन्नाट रेसिपी शेअर झाली आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत १८.३K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.