Masala Dal Recipe : डाळ हा आहारातील सर्वाधिक पोषक घटक असलेला पदार्थ आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी डाळीचा आहारात समावेश करायला पाहिजे. डाळ ही चवदारच नाही तर चांगल्या आरोग्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे.
सहसा आपण डाळीचे वरण पितो. याशिवाय अनेकदा डाळीपासून वेगवेगळ्या भाज्या आणि विविध पदार्थ बनवतो पण तुम्ही कधी मसाला डाळ खाल्ली आहे का? अगदी दहा मिनिटांमध्ये बनवली जाणारी मसाला डाळ रेसिपी आज आपण जाणून घेऊ या.
साहित्य:
- तुर डाळ
- जिरे
- हळद
- मोहरी
- हिंग
- तेल
- कोथिंबीर
हेही वाचा : साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? मग बनवा उपवासाचे घावन, सोपी रेसिपी लगेच नोट करा

Health Tips: जिमला न जाता देखील कमी होऊ शकते वजन; करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय

Health Tips: युरिक अॅसिड वाढले आहे? मग ‘हे’ चार घरगुती खाद्यपदार्थ वापरून पाहा; मिळेल आराम

Health Special: गणपती बाप्पाच्या लाडक्या मोदकाचं कॅलरी गणित

गच्चीवरची बाग: परसबागेतील गाजर, मुळा
कृती:
- तूर डाळ धुवून घ्या.
- त्यानंतर कुकरमध्ये तूर डाळ शिजवून घ्या.
- एका पातेल्यात तेल गरम करा
- गरम तेलात जिरे मोहरीची फोडणी द्या.
- त्यानंतर त्यात हिंग, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाका
- त्यात शिजवलेली डाळ घाला.
- डाळ चांगली शिजू द्या
- मसाला डाळ सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.