कोकणातील खाद्य संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल आहे. विशेषत: नॉनव्हेज खाण्यासाठी तर जगभरातील पर्यटक कोकणात येतात. बऱ्याचजणांसाठी नॉन व्हेज जीव की प्राण असते. काही खवय्ये तर नॉन व्हेज खाण्याची एकही संधी सोडत नाही. पण नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊ कधीतरी कंटाळा येऊ शकतो. आता विकेंडला घरच्या घरी ट्राय करा ही कोकणी पद्धतीची झणझणीत आणि टेस्टी अशी मटण रेसिपी. चला च मग जाणून घेऊया कोकणी पद्धतीनं मटण कसं करायचं.

कोकणी मटण साहित्य –

  • १ किलो मटण,
  • वाटणासाठी (१ चमचा खसखस, १ चमचा मिरी, १ दालचिनी, ८ लवंग, २ वेलदोडे)
  • १ मोठा चमचा ओलं खोबऱ्याचं वाटण
  • १ मोठा चमचा वाटलेले काजू,
  • १ मोठा चमचा गरम मसाला, ५ चमचे लाल तिखट
  • २ चमचे आलं-लसूण- मिरची-कोथिंबीरीचं वाटण
  • हळद, चवीनुसार मीठ, तेल

कोकणी मटण कृती –

सर्वप्रथम मटण धुवून कापून घ्या. नंतर प्रेशर कुकरमध्ये चिमूटभर मीठ टाकून शिजवून घ्या. साधारण एक ते दोन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्या. मटणाला मीठ हळद लावून शिजवून घ्या. गरम तेलात वाटलेला मसाला, आलं-लसूण, मिरची, कोथिंबीरीचं वाटण, वाटलेलं खोबरं, काजू टाकून परतावा. गरम मसाला, चवीनुसार मीठ व लाल तिखट टाका. शिजलेलं मटण टाकून तेल सुटेपर्यंत परता. पाणी घालून उकळी येईपर्यंत शिजवा.  शेवटी कोथिंबीरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

हेही वाचा – चमचमीत मेजवानी: सुक्या बोंबलाचा झणझणीत ठेचा; रेसिपी एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हीही कोकणी पद्धतीचं मटण नक्की ट्राय करा, आणि कसं होतं हे आम्हाला कळवा.