Palak Bhaji Recipe : सध्या हिवाळा सुरू आहे. सध्या मार्केटमध्ये हिरव्या पालेभाज्या आल्या आहेत. हिवाळ्यात अनेक जण आवडीने पालक, मेथी खातात. अनेक लोकांना पालक आणि मेथी ची भाजी खूप आवजते. तुम्ही अनेकदा पालकची भाजी, आमटी, पालक पराठा किंवा पालक पुरी अनेकदा खाल्ली असेल पण तुम्ही कधी पालक पासून बनवली जाणारी भजी खाल्ली आहे का? पालकापासून बनवली जाणारी ही भजी चवीला अप्रतिम आणि स्वादिष्ट वाटतात.

पालक ही अत्यंत गुणकारी भाजी म्हणून ओळखली जाते. पालक खाण्याचे अनेक फायदे आहेत. पालकामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पालक खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला माहिती आहे का कुरकुरीत पालक भजी कशी बनवायची? त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी जाणून घ्यावी लागेल. चला तर ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.

साहित्य

  • पालक
  • बेसन
  • कांदा
  • मिरची
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • ओवा
  • तिळ
  • आलं लसणाची पेस्ट
  • हळद
  • तेल
  • मीठ

हेही वाचा : यंदा नवीन वर्षाला काय गोड काय बनवताय? साजूक तुपातला बदाम शिरा बनवा, रेसिपी जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृती

  • सुरुवातीला पालक स्वच्छ धुवून घ्या आणि नंतप बारीक चिरून घ्या.
  • त्यानंतर बारीक चिरलेली पालक कुकरमध्ये पाणी टाकून शिजवून घ्या.
  • एका भांड्यात बेसन घ्या.
  • या बेसनामध्ये बारीक चिरलेला लांब आकाराचा कांदा, चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, ओवा, तिळ टाका
  • त्यानंतर यात आलं लसणाची पेस्ट टाका
  • यात हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ टाका
  • त्या नंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका
  • शेवटी कुकरमध्ये शिजवलेली पालक यात एकत्र करा
  • त्यानंतर सर्व एकजीव करा
  • त्यात थोडे पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा.
  • एक कढई घ्या आणि गॅसवर ठेवा
  • या कढईत तेल गरम करा.
  • या गरम तेलातून या मिश्रणापासून भजे काढा.
  • भजे काढताना हलक्या हाताने तेलात भजे सोडा.
  • कमी आचेवर हे भजे तळून घ्या. तेव्हाच ते आतून नीट शिजतील.
  • पालक भज्यांची चव अप्रतिम लागते.
  • हे भजे तुम्ही चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता.