पालेभाज्या खायला लहान मुलं नाटकं करतात किंवा अनेकदा मोठ्यांनाही पालेभाज्या खाणं नको वाटतं. मेथी, पालक, शेपू, चवळी अशा या पालेभाज्या तुम्ही नेहमीच खात असाल.याचाच वापर करून तुम्ही भजी, पराठा बनवू शकता किंवा साधा वरण भात केला तरी वरणात या भाज्यांचा समावेश करू शकता. चला तर मग आज पाहूयात, पालक फ्राय भाजीची रेसिपी. पालक आरोग्यास गुणकारी अशी भाजी आहे. भारतात अनेक जण आपल्या आहारात पालकाचा समावेश करतात. त्यापासून अनेक खाद्यपदार्थही बनवले जातात. लुसलुशीत हिरवीगार पालकाच्या हिरव्या पानांमध्येही जास्तीत जास्त पोषणघटक आपोआप तयार होत असतात. इतर हिरव्या पालेभाज्यांच्या तुलनेत पालक भाजी ही निवडायला आणि भाजी तयार करायला देखील सोपी आहे. 

पालक फ्राय भाजी साहित्य

पालकाच्या दोन जुड्या निवडून घेतलेल्या धुवून बारीक चिरलेल्या
४ कांदे बारीक कापलेले
१५ लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या
१ चमचा जिरे चिमूटभर हिंग
चमचा हळद दीड चमचा तिखट
चवीनुसार मीठ
१ टेबल स्पून तेल
२ लाल मिरच्या

पालक फ्राय भाजी कृती

१. सर्वात आधी पालकची भाजी स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे. तेल गरम झालं की जिरं हिंग व चिरलेला लसूण घालून खमंग फोडणी करावी.

२. लसूण लालसर झाला की त्यामध्ये कांदा,हळद, लाल मिरची घालून कांदा छान लालसर परतावा. मग त्यामध्ये चिरून ठेवलेली भाजी घालावी तिखट मीठ घालून मिडीयम गॅसवर वाफेवर भाजी शिजू द्यावी. मध्ये परतत राहावे.

हेही वाचा >> विदर्भातील पारंपरिक चमचमीत डाळ भाजी; नक्की ट्राय करा ही सोपी मराठी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३. सात ते आठ मिनिटात भाजी शिजते त्यावर झाकण ठेवू नये नंतर त्याला पाणी सुटते. वाफेवर छान भाजी परतली किती गरम गरम चपातीबरोबर भाकरी बरोबर आपणही खाऊ शकतो.