Potato Beetroot Paratha: पोळी, भाकरी खाऊन अनेकदा कंटाळा येतो. यासाठीच वेगळं काहीतरी म्हणून आपण पराठे करतो. त्यातही अनेक प्रकारचे पराठे असतात. मेथी पराठा, आलू पराठा इत्यादी. मुलांना नाश्ता देताना सगळ्यात आधी आपण त्यांना काय पौष्टिक देऊ शकतो याचा विचार करतो. म्हणूनच आज आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत. जी चवदार तर असेलच पण त्यापेक्षा जास्त पौष्टिक असेल. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी कसे बनवायचे पोटॅटो बीटरूप पराठे.

साहित्य

२ कप गव्हाचे पीठ

१ टेबलस्पून बीटरूट पेस्ट

२ उकडलेले बटाटे

१ टेबलस्पून लाल मिरची पावडर

१/२ टेबलस्पून मीठ

१/२ टेबलस्पून धणे पावडर

१/२ टेबलस्पून गरम मसाला

कोथिंबीर

हेही वाचा… पनीरचा वापर करून बनवा ‘स्पेशल कोरमा’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

कृती

  1. पीठ बनवण्यासाठी २ कप गव्हाचे पीठ, १ टेबलस्पून बीटरूट पेस्ट आणि पाणी घ्या.
  2. मऊ पीठ बनवा.
  3. बटाट्याच्या स्टफिंगसाठी २ उकडलेले बटाटे घ्या, त्यात १ टेबलस्पून लाल मिरची पावडर, १/२ टेबलस्पून मीठ, १/२ टेबलस्पून धणे पावडर, १/२ टेबलस्पून गरम मसाला आणि कोथिंबीर घाला.
  4. पीठाचा गोळा करून त्याचे पोळी करा, त्यात बटाट्याच्यं स्टफिंग घाला. पराठ्याला कोणताही आकार करा.
  5. दोन्ही बाजूंनी भाजा.
  6. तुमचे स्वादिष्ट पोटॅटो बीटरूट पराठे तयार आहेत. आनंद घ्या!

हेही वाचा… ‘गाजर बर्फी’ खाल तर बाकी मिठाई विसराल! घरच्या घरी झटपट बनवा अन् रेसिपी लगेच लिहून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.