Banana Bhaji Recipe In Marathi: केळ्यांमध्ये भरपूर पोषक तत्व आणि जीवनसत्व आढळतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने केळ हे उत्तम फळ मानले जाते. पण तुम्हाला माहितेय का कच्ची केळी खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत कच्ची केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे सर्व आरोग्याचे फायदे मिळवताना तुमच्या जिभेला तडजोड करावी लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत. आज आपण लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातील केळ्याच्या भाजीची चविष्ट रेसिपी पाहणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यात चवीला कमाल भाजी तुम्ही कधीही करू शकता. मुख्य म्हणजेच हे वन पॉट मील आहे म्हणजेच पोळ्या- भात करण्याची कटकटच पडणार नाही. चला तर पाहुयात..

केळ्याची भाजी रेसिपी

साहित्य : ५-६ कच्ची, स्वच्छ व मोठी केळी, अर्धा चमचा मिरपूड, अर्धी वाटी मुगडाळ, २ चमचे साखर, ४ चमचे तूप, हिंग चवीनुसार

कृती: केळ्याचा अग्र व मूलभाग बाजूला करून घ्या त्यानंतर उर्वरित केळ्याचे २ ते ३ भाग करून घ्या. हे काप स्वच्छ पाण्यात टाकून ठेवा. यानंतर मंद आचेवर केळ्याचे काप शिजवून घ्या, यानंतर केळी थोडी थंड झाल्यावर त्यात साखर व मिरपूड घालावी. यानंतर एका वेगळ्या कढईत हिंग व तूप घालून त्यात अर्धी वाटी मुगडाळ घालावी. ही डाळ मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. यात शिजलेली केळी घालून घोटून घ्या, तुपामुळे या भाजीला चांगला क्रिस्प येईल, ही खमंग कुरकुरीत भाजी चवीला कमाल होते. कोथिंबीर व लिंबाचा रस घालून भाजी सर्व्ह करू शकता.

हे ही वाचा<< बाजारात खोट्या बटाट्यांनी वाढली डोकेदुखी! तुम्ही खाताय तो बटाटा खरा आहे का कसे ओळखाल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा व कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.