Jaggery Chocolate Cake: अनेकजण चॉकलेट आवडीने खातात. केक सुद्धा चॉकलेटचाच खाणे पसंत करतात. आजपर्यंत आपण अनेक प्रकारचे केक खाल्ले आसतील. आणि केक खायला तर सर्वानाच आवडतात. अनेकदा आपण वाढदिवसानिमित्त आपल्या आप्तेष्टांच्या घरी केक घेऊन जातो. परंतु ५०-६० वर्षाच्या वयाच्या व्यक्तीसाठी कोणत्या प्रकारचा केक घेऊन जावा असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. ह्या वयातील बहुतांश लोकांना Ragi चे ऐकतो मग अशा लोकांना गोड खाण्यास मनाई असते. अति गोड खाणे हे आपल्या शरीराला हानिकारक ठरते म्हणून च आज आपण असा केक पाहूया जो आपल्या आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि चवीला सुद्धा स्वादिष्टया आणि लहानग्यांसाठीही पौष्टीक असा नाचणीचा पौष्टिक केक. जो कमी सामग्री मध्ये आणि सध्या सोप्या पद्धतीत करता येऊ शकतो.

नाचणी केक साहित्य –

  • नाचणी पीठ तीन ते चार कप
  • गुळ पावडर एक कप
  • बेकिंग पावडर एक चमचा
  • दही चार चमचे
  • दूध तीन ते चार कप
  • व्हॅनिला इसेन्स एक चमचा
  • कोको पावडर तीन ते चार कप
  • खायचा सोडा एक चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल एक कप
  • गव्हाचे पीठ दिड कप
  • क्रीम एक कप

केक बनविण्यासाठी कृती –

सर्वप्रथम एक बाउल घेऊन त्यामध्ये एक कप तेल आणि तीन कप कोको पावडर घेऊन ती एकत्र करून घ्यावी ,दही चार चमचे, तीन कप दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर त्यात एक चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून गव्हाचे पीठ, नाचणीचे पीठ ,गुळ पावडर, खायचा सोडा , कोको पावडर , आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकत्र करून फेटून घ्यावे. एकजीव झालेले हे मिश्रण केकच्या एका भांड्यात बटर पेपरवर टाकून त्यात ते मिश्रण ओतून ३० मिनिटे ओव्हनमध्ये ठेवावे. आता अलगद केकच्या पुठ्ठ्यावर केक काढून त्यावर चॉकलेटचे लेअर लावा. ड्राय फ्रूटने सजवून थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

हेही वाचा – आंबा पोळी..वर्षभर टिकणारी, नैसर्गिरित्या घरच्या घरी बनवा टेस्टी मँगो डीश

अशाप्रकारे खाण्यासाठी तयार पौष्टिक नाचणीचा केक तयार आहे.