Raksha Bandhan 2023 Special Sweet Recipes for Brother : रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींच्या नात्याचे महत्व सांगणारा एक पवित्र सण आहे, जो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण ३० ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याला गोड मिठाई भरवते. यादिवशी भाऊ जर बहिणीच्या घरी आला असेल तर बहिण त्याच्यासाठी अनेक गोड स्वादिष्ट पदार्थ तयार करते. यामुळे आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त घरच्या घरी बनवू शकता असे ३ गोड पदार्थ सांगणार आहोत. जे तु्म्ही सहज तयार करु शकता, चला जाणून घ्या रेसिपी….

रक्षाबंधनानिमित्त घरी बनवा ‘हे’ गोड पदार्थ

१) केसर खीर

साहित्य

१ कप तांदूळ, १ लिटर फूल क्रीम दूध, आवश्यकतेनुसार केशरचे तुकडे, १ टीस्पून वेलची पावडर, १ टीस्पून बदाम, ५ -१० मनुके, १ टेबलस्पून ड्राय फ्रूट्स

कृती

१) सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या ते किमान १ ते २ तास भिजवा.

२) आता एका मोठ्या पॅनमध्ये दूध टाका आणि मध्यम आचेवर उकळा.

३) यादरम्यान तव्यावर एक चमचा दूध घेऊन त्यात केशरचे धागे टाका आणि ते मिश्रण बाजूला ठेवा.

४)आता उकळत्या दुधात ड्रायफ्रुट्स मिक्स करा, त्यानंतर वेलची पावडरही मिसळा.

५) यानंतर भिजवलेले तांदूळ घालून चांगले मिक्स करावे.

६) तांदूळ सुमारे १५ ते २० मिनिटे शिजू द्या, नंतर साखर मिसळा. आता केशर आणि दुधाचे मिश्रण घाला. अशाप्रकारे तयार झाली स्वादिष्ट केसर खीर.

२) नारळाचे लाडू

साहित्य

१ कप सुके नारळ, १/२ कप पाणी, १ कप साखर, १ टीस्पून हिरवी वेलच

कृती

१) एका पातेल्यात पाणी घेऊन ते उकळा. त्यानंतर त्यात साखर मिक्स करा.

२) आता ८ ते १० मिनिटे गॅसवर उकळू द्या. आता एकप्रकारे जाड पाक तयार झाल्यावर गॅस कमी करा.

३) साखरेच्या पाकात घिसलेले सुके खोबरे मिक्स करा आणि गॅस बंद करा. नंतर त्यात हिरवी वेलची पावडर मिक्स करा.

४) आता हे मिश्रण एकदम थंड होण्याच्या आत त्याचे लाडू लाडू तयार करा. यात तु्म्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स देखील मिक्स करु शकता.

३) चंद्रकला

साहित्य

४ कप मैदा, १०० ग्रॅम तूप, २०० ग्रॅम खवा, १ टीस्पून ड्राय फ्रूट्स, १ टीस्पून वेलची पावडर, २-३ टेबलस्पून साखर, १ कप पाणी, तळण्यासाठी तेल.

कृती

१) सर्व प्रथम एका बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात थोडे तूप मिक्स करा, आता आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या, आता ते ओल्या कपड्याने झाकून ठेवा.

२) यानंतर कढई गरम करून त्यात खवा २-३ मिनिटे परतून घ्या. ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर नीट मिक्स करा.

३) खवा थंड झाल्यावर त्यात साखर घाला.

४) यानंतर पिठाचा मध्यम आकाराचा गोळा बनवा.

५) गोळा पुरीप्रमाणे लाटून त्यात खवा भरा आणि हाताने हलके दाबून गोल आकारात बंद करा. आपण इच्छित असल्यास, आपण ते डिझाइनमध्ये देखील दुमडू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६) कढईत तेल गरम करून त्यात चंद्रकला तळून घ्या. यानंतर साखरेच्या पाकात थोडा वेळ भिजवा. अशाप्रकारे खाण्यासाठी तयार झाल्या गोड स्वादिष्ट चंद्रकला