आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. जेवणासोबत कैरी खाण्याची तर एक वेगळीच मजा असते. पिंपल्स, उष्मघात, अपचनाची समस्यां यासाठी कैरी एक उपयोगी फळ आहे. शरीरात विटामीन’सी’ किंवाविटामीन’ए’ चे प्रमाण कमी झाल्यास ते पुन्हा मिळवण्यासाठी कैरी फायदेशीर आहे.आपण या कैरीचे विविध पदार्थ बनवूनही खाऊ शकतो. आज आपण जाणुन घेणार आहोत कैरीचे सॉस कसे बनवायचे…

कैरी सॉस साहित्य

  • १ लहान कैरी
  • १ वाटी साखर
  • ८-१० काश्‍मिरी लाल मिरच्या
  • २ टेबल स्पून लसूणपाकळ्या
  • मीठ

कैरी सॉस कृती

१. कैरीचं साल काढून घ्या.

२. १ टी स्पून कैरी बारीक चिरा.

३. बाकीची चिरून मिक्‍सरवर बारीक करा.

४. काश्‍मिरी मिरची अर्धा तास पाण्यात भिजवा. मिक्‍सरवर बारीक करा.

५. ललसूण पाकळ्या चिरून ठेचून घ्या. सगळं साहित्य एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवा.

६. अर्ध्या तासाने जाड बुडाच्या पातेल्यात हे मिश्रण घालून मंद गॅसवर शिजायला ठेवा.

हेही वाचा >> फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, १५ मिनिटतात ५० पापडाची सोपी कृती

७. मधे मधे ढवळत रहा. मिश्रण घट्ट वाटलं तर पाव वाटी व्हाइट व्हिनेगर किंवा पाणी घाला. पारदर्शक झालं की गॅस बंद करा.