उन्हाळ्यात थंडगार सरबत सर्वांनाच प्यायला आवडते. सहसा उन्हाळ्यात आपण लिंबू सरबत पितो. कैरीचे पन्हे कधीतरी बाजारातून कैरी आणली बनवले जाते पण आता तुम्ही केव्हाही कैरीचे सरबत पिऊ शकता. या आधी आम्ही तुम्हीला लिंबू सरबत पावडर कशी बनवयाची हे सांगितले आता आम्ही तुम्हाली कैरी सरबत पावडर कशी बनवायची हे सांगणार आहोत. उन्हान त वाळवता तुम्ही कैरी सरबत प्रीमिक्स तयार करू शकता. फ्रिजशिवाय ही पावडर महिनाभर टिकू शकते. चला तर मग जाणून घेऊ या कैरी सरबत पावडर रेसिपी

कैरी सरबत प्रीमिक्स / कैरी सरबत पावडर रेसिपी
साहित्य
कैरी – २
साखर किंवा गुळ – तीन-चार वाट्या
मीठ -चवीनुसार

कैरीची साल काढून त्याचे काप करा. मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करा. एका भांड्या कैरीचा टाका त्यात तीन चार वाट्या साखर, हिरवा रंग, मीठ टाकून एकत्र करा. दोन चार ताटामध्ये पसरवून घ्या. दोन -तीन दिवस ते पेस्ट चांगली वाळू द्या. तीन दिवसांनी ते चमच्याने खरडून काढा. खडखडीत वाळलेले कैरीचे खडे मिक्सरमध्ये फिरवून पावडर करा. एका हवाबंद बरणीमध्ये साठवून ठेवा. जेव्हा थंडगार कैरीचे सरबत प्यायचे असेल तेव्हा एका ग्लासात पाणी घ्या आणि दोन चमचे कैरीची सरबत पावडर टाका. कैरीचे सरबत तयार आहे. उन्हाळ्यात थंडगार कैरीच्या सरबताचा आनंद घ्या.

हेही वाचा – शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली १० हजार किलोंची मिसळ; अजित पवार अन् चंद्रकांत पाटलांनीही मारला ताव, पाहा Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – खेळता खेळता हरवला १२ वर्षाचा चिमुकला! QR code पेंडेंटमुळे पुन्हा पालकांना भेटला! ८ तासात पोलिसांनी लावला शोध
टिप – साखरेऐवजी गूळ वापरला तरी चालेल.. गुळ थोडा मिक्सरला फिरवून घ्यावा लागेल. म्हणजे कैरीचा गर आणि गुळ एक ते दोन मिनिट मिक्सरला फिरवून घ्यावा.