शुभा प्रभू साटम

खरे तर हा आपला भातवडा, पण मुलांना एकदम आवडेल असे पॉश नाव म्हणजे चीझ बॉल वगैरे.

साहित्य

१ मोठी वाटी उरलेला भात, पाव वाटी किसलेले चीझ, पालक, मका दाणे, गाजर, आलं-मिरची-लसूण वाटण, इटालियन सिझलिंग, मैदा, पाणी, ब्रेड क्रम्स, तेल, मीठ, साखर

कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाण्याचा हात लावून भात मळून घ्यावा. पालक, मका दाणे उकडून घ्यावेत. पालक चिरावा तर मक्याचे दाणे थोडे कुस्करून घ्यावे. गाजर बारीक किसून घ्यावे. आता भातामध्ये पालक, मका, गाजर, आलं-लसूण-मिरची वाटण, इटालियन सिझलिंग, मीठ, साखर हे सारे घालून घ्यावे. याचे गोल गोळे करून थोडा वेळ फ्रिजमध्ये उघडेच ठेवावे म्हणजे ते चांगले घट्ट होतील. आता मैदा आणि पाण्याचे दाटसर मिश्रण करून घ्यावे. फ्रिजमधून काढलेले हे गोळे मैद्याच्या मिश्रणात बुडवून मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवावेत आणि तेलात लालसर रंगावर तळून घ्यावेत. चटणी किंवा सॉसबरोबर गट्टम करावे.