महाराष्ट्र हा आपल्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. त्यात खाद्य संस्कृती महत्त्वाची भूमिका बजावते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात खाद्यसंस्कृतीमध्ये विभिन्नता दिसून येते आणि हिच खाद्यसंस्कृती त्या भागाची ओळख बनते. महाराष्ट्रातील सातारा हा त्याच्या झणझणीत अन् रांगड्या स्वभावासाठी ओळखला जातो. जिल्ह्यातील शेंगदाण्याचा म्हाद्या विशेष प्रसिद्ध आहे. इतर भागातील लोक याला शेंगदाण्याची आमटीही संबोधतात. आज आपण या सातारा स्पेशल शेंगदाण्याचा म्हाद्या या खास रेसिपीविषयी जाणून घेणार आहोत.

सातारा स्पेशल शेंगदाण्याचा म्हाद्या साहित्य –

  • १/२ कप शेंगदाणे
  • १ कप कांदा चिरलेला
  • १/२ टीस्पून जीरे
  • १ टीस्पून कांदा लसूण मसाला (लाल तिखट)
  • १/२ टीस्पून हळद
  • १/२ टीस्पून मीठ
  • २ टेबलस्पून तेल

सातारा स्पेशल शेंगदाण्याचा म्हाद्या कृती –

स्टेप १
शेंगदाणे थोडे भाजून घ्या व त्याचा जाडसर कुट करून घ्या. कांदा, कोथिंबीर चिरून घ्या.

स्टेप २
कढईत तेल तापत ठेवावे. तापले कि त्यात जीरे घाला, जीरे फुलले की कांदा घालून छान परतून घ्या. नंतर त्यात केलेला शेंगदाणे कुट घाला नी परत परतून घ्या. नंतर लाल तिखट, हळद, मीठ घाला परता शेवटी १ कप गरम पाणी घाला आणि भाजी शिजवून घ्या.

स्टेप ३
भाजी परतून थोडी खालीलप्रमाणे घट्ट करा. भाजी तयार आहे. आता वरुन कोथिंबीर घाला.

हेही वाचा >> झणझणीत तर्रीवाली खानदेशी अंडा करी; ट्राय करायलाच हवी अस्सल खान्देशी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टेप ४
मस्त झणझणीत लज्जतदार महाद्या तयार आहे. भाकरी, चपाती बरोबर मस्त लागते ही रेसिपी.