दिवाळीच्या फराळात चकली किंवा चिवडा हा हमखास केला जातो कारण सर्वाना त्याचा कुरकुरीतपणा आणि तिखटपणा सर्वांना आवडतो. पण असाच आणखी एक पदार्थ आहे जो दिवाळीत आवर्जून बनवला जातो. तो म्हणजे कडबोळी. यालाच कडबोळे असेही म्हणतात. कडबोळी हा एक महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ आहे जो भाजणीच्या पिठापासून तयार केला जातो. चकलीसारखाच कुरकरीत आणि चविष्ट असतो. चहासह स्नॅक्स म्हणून तुम्ही तो खाऊ शकता. जाणून घ्या रेसिपी.

कुरकरीत कडबोळी रेसिपी

साहित्य:

Aloo Matara bhaji without oil
VIDEO : एकही थेंब तेल न वापरता बनवा बटाट्याची चमचमीत भाजी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
sweet potato kachori recipe
उपवासाला वरई, साबुदाणा खाऊन कंटाळलात? मग नक्की करून पाहा रताळ्याची चटपटीत कचोरी
Kobichi vadi recipe in marathi
कोबीची भाजी खाऊन कंटाळलात? संकष्टीनिमित्त करा ‘कोबीची खमंग वडी’; पटकन नोट करा सोपी रेसिपी
Summer Special Drink Coconut Lassi Recipe in marathi
Coconut Lassi: उन्हाळ्यात फक्त चवच नाही तर आरोग्याची काळजी घेते कोकोनट लस्सी, नोट करा पंजाबी रेसिपी

२५० ग्रॅम तांदूळ
१०० ग्रॅम ज्वारी
१०० ग्रॅम बाजारी
१०० ग्रॅम गहू
१ चमचा चाणा डाळ
१ चमचा उदडाळ
१ चमचा मुगाची डाळ
१ चमचा जिरं
१ चमचा धणे
१/४ चमचा हळद
१ चमचा मिक्स करा
१ कप पाणी
मीठ
तळण्यासाठी तेल

हेही वाचा – Diwali Faral : घरीच बनवा चटपटीत, कुरकुरीत तिखट बुंदी; जाणून घ्या कशी पाडावी बुंदी?

कृती

  • भाजणीचे पीठ बनवण्यासाठी तवा गरम करा. त्यात तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, उडीद डाळ, मूग डाळ, जिरे आणि धणे यापासून वर दिलेली सर्व धान्य चांगली भाजून घ्या. त्यांना बाजूला ठेवा.
  • सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. भाजणीचे पीठ तयार आहे.
  • एका गोल तळाच्या पॅनमध्ये थोडे पाणी गरम करा. हळद, मीठ, मिक्स मसाला आणि थोडे तेल घाला. पाणी एक उकळी आणा आणि नंतर गॅल बंद करा.
  • भाजणीचे पीठ घालून चांगले मिक्स करावे. मिश्रण काही वेळ थंड होऊ द्या.
  • नंतर थोडे पाणी घालून त्या मिश्रणाचे पीठ मळून घ्या
  • कडबोलीला हाताने वळून हातानेच गोलाकार द्या.
  • कडबोळी गरम तेलात रंग बदलेपर्यंत तळून घ्या

हेही वाचा – Diwali Faral : कुरकुरीत शेव खायला आवडते? मग आता घरीच बनवा, जाणून घ्या बेसन शेव रेसिपी

कुरकुरीत कडबोळी गरमागरम चहासोबत सर्व्ह करा.