How To Make Mix Dosa : नाश्त्यासाठी सर्वाधिक दक्षिण भारतीय पदार्थ पसंत केले जातात. जसे की, पोहे, उपमा, इडली, मेदूवडा, डोसा, शिरा, उत्तप्पा हे पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम पर्याय तर आहेतच; पण ते पचायलाही हलके असतात. बाहेर फिरायला गेलो तरी एखाद्या हॉटेलात जाऊन अशा हेल्दी; पण तरीही चटपटीत अशा या पदार्थांवर आपण ताव मारतो. पण, आज आपण आरोग्यदायी डाळींपासून पौष्टीक डोसा बनवणार आहोत. कसा बनवायचा हा डोसा चला जाणून घेऊयात…
साहित्य
- १/३ कप नाचणी
- काळा चणा १/२ कप
- चण्याची डाळ १/३ कप
- उडीद डाळ १/३ कप
- मूग डाळ १/३ कप
- तूर डाळ १/३ कप
- ३०० मिली पाणी
- १ ते २ हिरव्या मिरच्या
- कढीपत्ता
- आले
- चवीनुसार मीठ
- १ चमचा तूप
व्हिडीओ नक्की बघा…
कृती
- सर्व डाळी, नाचणी, चणे धुवून रात्रभर भिजवत ठेवा.
- दुसऱ्या दिवशी सकाळी, पाणी काढून टाका आणि ब्लेंडरमध्ये थोडे पाणी, हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता घालून बारीक वाटून घ्या.
- त्यानंतर तयार मिश्रणात मीठ घाला आणि १० ते १५ मिनिटे राहू द्या.
- नेहमीप्रमाणे डोसा बनवा.
- आवडीच्या सॅलड आणि चटणीसोबत सर्व्ह करा.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @somewhatchef या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
