How To Make Sponge Dosa : सकाळ चहाबरोबर डोसा, उपमा, शिरा, पोहे, इडली या पदार्थांच्या नाश्त्याने हमखास होते. तसेच बाहेर स्टॉलवरसुद्धा साधा डोसा, शेजवान डोसा, मंचुरियन डोसा, म्हैसूर डोसा, रवा डोसा असे विविध प्रकारचे डोशाचे प्रकार उपलब्ध असतात. पण, तुम्ही कधी कापसासारखा मऊ डोसा खाल्ला किंवा बनवला आहे का? नाही तर मुलांच्या डब्यासाठी, अगदी कामावर जाणाऱ्या मंडळींसाठी तुम्ही असा कापसासारखा मऊ डोसा बनवू शकता.

साहित्य –

  • पोहे – १ कप
  • कुरमुरे – १ कप
  • रवा – १ कप
  • दही – अर्धा कप
  • पाणी – २ ते ३ कप
  • साखर – १ चमचा
  • चवीनुसार मीठ
  • बेकिंग सोडा – अर्धा चमचा
  • तेल किंवा तूप

व्हिडीओ नक्की बघा…

कृती –

  • मिक्सरच्या भांड्यात पोहे, कुरमुरे, रवा, दही, साखर, मीठ घालून मिश्रण बारीक करून घ्या.
  • त्यानंतर एका भांड्यात मिश्रण काढून घ्या आणि त्यात पाणी घाला.
  • १५ मिनिटे मिश्रण तसेच राहू द्या.
  • त्यानंतर पिठात एक चमचा बेकिंग सोडा आणि पाणी टाका.
  • मिश्रण एकजीव करून घ्या.
  • व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तव्यावर तयार मिश्रणाचा डोसा बनवायला सुरुवात करा; त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवा.
  • नंतर त्यावर तेल किंवा तूप टाका.
  • अशाप्रकारे तुमचा डोसा तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @homecheff_renu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.