Vegetable Pancake Recipe In Marathi : सध्या लहान मुलांची दिवाळीची सुट्टी सुरु आहे. दिवाळीत फराळ, मिठाई असे गोड पदार्थ सकाळी, संध्याकाळी नाश्त्याला असतात. हे पाहून लहान मुले नाक मुरडतात. तर तुम्हालाही गोड खाण्याचा कंटाळा आला असेल तर आणि चमचमीत खाण्याची इच्छा असेल तर भाज्यांचा पॅनकेक बनवू शकता. तर नक्की हा भाज्यांचा पॅनकेक कसा बनवायचा याबद्दल जाणून घेऊयात…
साहित्य
- १ कप चिरलेला कोबी
- १ चिरलेला कांदा
- १ चिरलेला टोमॅटो
- २ चिरलेली हिरवी मिरची
- १/४ कप धणे
- १ चमचा लाल मिरची पावडर
- आलं-लसूणची पेस्ट
- २ चमचा धणे पावडर
- १ चमचा जिरे पावडर
- १ कप तांदळाचे पीठ
- १/३ कप बेसन
- २ चमचा मिरचीचे तुकडे
- चवीनुसार मीठ
- तेल
- पाणी
व्हिडीओ नक्की बघा…
कृती
- एका भांड्यात कोबी, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं-लसूणची पेस्ट, धणे, जिरे पावडर, लाल तिखट, मीठ, तांदळाचे आणि बेसनाचे पीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करा.
- त्यानंतर व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे मिश्रणाचे तव्यावर पॅन केक बनवायला सुरुवात करा.
- त्यानंतर हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खायला द्या आणि मनोसोक्त आनंद घ्या.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @purna_recipes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
