पोळी-भाजी आणि भात-डाळ हा आहारातील एक महत्वाचा भाग मानला जातो. सकाळी, दुपारी आणि रात्रीच्या जेवणात हे दोन पदार्थ हमखास असतात. लोकांना गरम गरम पोळी खाण्यास खूप आवडते. तर तूम्हाला सुद्धा पोळी खाण्यास आवडत असेल. तर आज पोळी या पदार्थापासून बनवलेला एक खास पदार्थ तुम्ही काही मिनिटांत घरच्या घरी बनवू शकता. याचे नाव आहे ‘अंडा पोळी’ (Egg Roti). तुम्ही आतापर्यंत अंड्यापासून ऑम्लेट, बुर्जी, अंडा मसाला आदी अनेक पदार्थ खाल्ले असतील. पण, अंडा पोळी हा पदार्थ तुम्ही आजवर खाल्ला नसेल. चला तर पाहुयात या पदार्थाची सोपी रेसिपी…

साहित्य:

  • चार पोळी
  • आलं लसूण पेस्ट – १ चमचा
  • कांदा – १
  • टोमॅटो -१ (छोटे टोमॅटो)
  • हिरवी मिरची २
  • अंडी – २
  • कडीपत्ता
  • हळद – १/४ चमचा
  • टोमॅटो केचप साॅस – १ चमचा
  • काळी मिरी पावडर – १/२ चमचा
  • गरम मसाला पावडर – १/२ चमचा
  • तेल – २ चमचा
  • मिठ

हेही वाचा…भेंडीची भाजी खाऊन कंटाळलात? तर फक्त दहा मिनिटांत बनवा ‘कुरकुरे भेंडी’; नोट करा ‘ही’ चटपटीत रेसिपी

कृती :

  • चार पोळी घ्या त्यांना रोल करा व सुरीने कापून घ्या.
  • त्यानंतर कांदा, टोमॅटो, मिरची बारीक चिरून घ्या.
  • नंतर एक पॅन घ्या आणि त्यात तेल घाला.
  • या तेलात कांदा, मिरची, कडीपत्ता, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट घालून मिश्रण चांगलं परतवून घ्या.
  • त्यानंतर मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घालून परतवून घ्या.
  • तसेच या मिश्रणाचा पॅनमध्ये एक वर्तुळ बनवून घ्या व त्यांच्या मधोमध दोन अंडी फोडून घ्या.
  • व पोळीचे सुरीने कापून घेतलेले तुकडे व थोडी काळी मिरी पावडर घाला.
  • पुन्हा एकदा सर्व नीट परतवून घ्या.
  • अशाप्रकारे तुमची ‘अंडा पोळी’ तयार.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chefvenvy या इस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.