15 December 2019

News Flash

हारुकी मुराकामींना नोबेल?

हा महिना जगभरातील शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखकांसाठी औत्सुक्याचा आणि उत्कंठेचा राहणार आहे. कारण येत्या आठवडय़ापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाईल.

| October 5, 2013 01:05 am

हा महिना जगभरातील शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखकांसाठी औत्सुक्याचा आणि उत्कंठेचा राहणार आहे. कारण येत्या आठवडय़ापासून नोबेल पुरस्कारांची घोषणा केली जाईल. साहित्याचा नोबेल पुरस्कार आठ ऑक्टोबरला जाहीर होईल. त्यासाठी कुणाकुणाची नावे चर्चेत आहेत याची चर्चा सध्या पाश्चात्य प्रसारमाध्यमांमध्ये चालू झाली आहे. ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे. त्यानंतर अमेरिकन लेखक जॉयस कॅरोल ओटस, हंगेरियन लेखक पीटर नादास, कोरियन कवी को उन आणि कॅनडियन कथालेखक अ‍ॅलिस मन्रो यांचा समावेश आहे.
हारुकी मुराकामी यांचे नाव नोबेल पुरस्काराच्या यादीत गेली दहा वर्षे सातत्याने येत आहे. पण या वर्षी ते सर्वात आघाडीवर आहेत. लवकरच त्यांची नवी कादंबरीही इंग्रजीत प्रकाशित होत आहे. त्यामुळे ती आतापासूनच चर्चेत आली आहे. आणि या वर्षीचा सर्वाधिक सट्टाही मुराकामी यांच्याच नावाने खेळला जातो आहे. गतवर्षीचे नोबेल चिनी कादंबरीकार मो यान मिळाले आहे. त्यामुळे परत आशियाई लेखकाचा विचार केला जाईल की नाही, याविषयी शंका आहे. पण मुराकामी यांच्या नावाची चर्चा आशियाई साहित्यजगतात चैतन्य निर्माण करणारी आहे हे मात्र नक्की.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
सोलो-अ जेम्स बाँड नॉव्हेल : विल्यम बॉयड, पाने : ३३६५९९ रुपये.
द ककूज कॉलिंग : रॉबर्ट गालब्रेथ, पाने : ४९४६९९ रुपये.
द किल लिस्ट : फ्रेड्रिक फॉर्सिथ, पाने : ३५२३९९ रुपये.
मॉम इन द सिटी : कौशल्या सप्तऋषी, पाने : ३४४२५० रुपये.
द टिडेस ऑफ मेमरी : सिडनी शेल्डन, पाने : ४००२९९ रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
गांधी बिफोर इंडिया : रामचंद्र गुहा, पाने : ६८८८९९ रुपये.
माय जर्नी- ट्रान्सफॉर्मिग ड्रीम्स इन्टु अ‍ॅक्शन्स : ए.पी.जे. अब्दुल कलाम, पाने : १६०१९५ रुपये.
व्हाय नेशन्स फेल : डॅरॉन अ‍ॅसोमोग्लू- जेम्स ए. रॉबिन्सन, पाने : ४६४/५९९ रुपये.
स्मार्ट ट्रस्ट : स्टिफन एम. आर. कोवे, रिबेका आर. मेरिल, ग्रेग लिंक, पाने : ३२०४९९ रुपये.
द फर्म-द स्टोरी ऑफ मॅकन्झी : डफ मॅकडोनाल्ड, पाने : ४००५९९ रुपये.
सौजन्य – फ्लिपकार्ट.कॉम

First Published on October 5, 2013 1:05 am

Web Title: haruki murakami favored to win nobel prize
टॅग Nobel Prize
Just Now!
X