News Flash

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प धोकादायकच!

असोनिया ताटवाटी..’ हे संपादकीय (२० जुल) वाचले. अणुऊर्जा ही ‘सुरक्षित, स्वच्छ आणि स्वस्त’ आहे, असा जो तद्दन खोटा प्रचार जगभरच्या अणुऊर्जेच्या प्रवर्तक आणि समर्थकांकडून केला

| July 27, 2015 01:20 am

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प धोकादायकच!

‘असोनिया ताटवाटी..’ हे संपादकीय (२० जुल) वाचले. अणुऊर्जा ही ‘सुरक्षित, स्वच्छ आणि स्वस्त’ आहे, असा जो तद्दन खोटा प्रचार जगभरच्या अणुऊर्जेच्या प्रवर्तक आणि समर्थकांकडून केला जातो, त्यास देशविदेशातील बरीच विद्वान मंडळीही बळी पडत असतात.
सोविएत युनियनमधील चेर्नोबिल येथे १९८६ मध्ये अणुऊर्जा प्रकल्पात भीषण अपघात झाल्यावर जगभरातील देशांना अणुऊर्जा प्रकल्पांची संभाव्य संहारक क्षमता ही एखाद्या विमान किंवा रेल्वे अपघाताइतकी मर्यादित नसल्याचे कळून चुकले. साहजिकच जगभरातून अणुऊर्जा प्रकल्पांना असलेली मागणी थंडावली. सोविएत रशियाच्या विघटनानंतर शीतयुद्ध समाप्त झाल्यावर अण्वस्त्र कमी करण्याबाबत रशिया आणि अमेरिकेत करार झाल्यामुळे मोडीत काढण्यात आलेल्या अण्वस्त्रांमधील प्लुटोनियम २३९ सारखी किरणोत्सारी द्रव्ये सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी वाढली. वास्तविक, खुद्द अमेरिकेत १९७३ सालानंतर एकाही नवीन अणुऊर्जा प्रकल्पाची मागणी नोंदविण्यात आली नव्हती. कारण अमेरिकेस अण्वस्त्रनिर्मितीकरिता आवश्यक असलेली प्लुटोनियम २३९ ची गरज तेव्हा संपली होती. भारतातील धोरणकर्त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पामुळे उद्भवणारे संभाव्य धोके नजरेआड करीत यात सहभागी होण्याचे ठरविले आणि देशातील सर्वसामान्य जनतेला, विशेषत: संभाव्य प्रकल्पबाधित जनतेला या धोक्यांविषयी पूर्ण कल्पना न देता अणुऊर्जा प्रकल्प पुढे रेटण्याचे ठरविले.
२०११ साली झालेली फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातील भीषण दुर्घटना वाहिन्यांवर प्रत्यक्ष पाहिल्यामुळे अनेकांना अणुऊर्जा प्रकल्पांच्या संहारक क्षमतेची जाणीव झाली, तरीही या देशातील बहुसंख्य लोकांना चेर्नोबिल दुर्घटना होऊन जवळजवळ ३० वष्रे होत आल्यावर, आजही तेथील सुमारे २८०० चौरस किमी इतका भूप्रदेश (जवळजवळ अर्धा सिंधुदुर्ग जिल्हा) निर्मनुष्य आहे, फुकुशिमामध्येही साधारण हीच परिस्थिती आहे, हे ठाऊक नाही. अपघातग्रस्त चेर्नोबिल प्रकल्पापासून सुमारे ५० किमी ते ५०० किमी त्रिज्येच्या परिसरातील मुलांमध्ये थायरॉइड कॅन्सर प्रचंड प्रमाणात वाढल्याचे ठाऊक नाही. मुंबईपासून १०० किमी अंतरावरील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ असलेल्या गावांतील ग्रामस्थांमध्ये वाढलेल्या किरणोत्सारसंबंधित व्याधींबद्दल अनेकांना माहीत नाही. युरेनियमचे खाणीतून उत्खनन, त्याचे सम्पृक्तीकरण, इंधनात रूपांतर, अणुकचऱ्याची साठवण आणि विल्हेवाट, अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी आणि त्या प्रकल्पाचे आयुष्य संपल्यावर तो सुरक्षितपणे मोडीत काढणे या सर्व प्रक्रियेत होणारे कार्बनचे उत्सर्जन आणि खर्च लक्षात घेतल्यास अणुऊर्जा ही स्वच्छ आणि स्वस्त नसल्याचे ध्यानात येईल.
फ्रान्समध्ये अरेवा बांधत असलेल्या अणुभट्टीच्या संयंत्राचे ओतकाम सदोष असल्यामुळे अणुभट्टीस धोका संभवतो, अशी खुद्द फ्रान्सच्या अणुऊर्जा नियंत्रक मंडळाने दिलेल्या माहितीच्या आधारावर बातमी प्रसिद्ध केली होती. तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या धोकादायक अणुभट्टय़ांसाठी, प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाकरिता फ्रान्सबरोबर करार केला. प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प ज्या माडबनच्या सडय़ावर उभारण्यात येणार आहे, त्या सडय़ाखालून भूभ्रंश रेषा जात असल्याचे लक्षात घेतल्यास, पंतप्रधानांची कृती दुसऱ्या भोपाळ दुर्घटनेस आमंत्रण ठरेल हे सांगण्यास ज्योतिषाची आवश्यकता भासणार नाही.
डॉ. मंगेश सावंत

संपुआ’ने दहा वर्षांत काही चांगली कामेही केली..

‘असोनिया ताटवाटी..’ हा अग्रलेख (२० जुल) वाचला. त्यात शेवटी भारतातील वीजनिर्मितीच्या अनुषंगाने जी आकडेवारी दिली आहे, ती उद्बोधक आहे. या आकडेवारीनुसार २००५ साली भारतात १ लाख २० हजार ५१४ मेगावॅट इतक्या विजेची निर्मिती होत होती. त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे आता ही आकडेवारी २ लाख ७२ हजार ५०३ मेगावॅट इतकी आहे. थोडक्यात, गेल्या १० वर्षांत वीज निर्मितीत १२६ टक्क्यांनी वाढ झाली. अणुऊर्जेच्या बाबतीत बोलायचे तर २००५ साली २,७७० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होत होती, तर आता या माध्यमातून ५,७८० इतक्या विजेची निर्मिती होते. म्हणजेच गेल्या १० वर्षांत यात १०९ टक्क्यांनी वाढ झाली. तात्पर्य, परंपरागत व अणुऊर्जेच्या माध्यमातून देशातील वीजनिर्मितीत वाढ झाली आहे, हे वास्तव आहे. त्याचबरोबर अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे अणुकरारावरून भाजपने जर श्रेय लाटण्याच्या िनदनीय प्रयत्नातून अडवाअडवीचे धोरण अवलंबिले नसते, तर या क्षेत्रातून निश्चितच अधिक वीजनिर्मिती करणे शक्य झाले असते, यात शंका नाही. तरीही या आकडेवारीवरून दहा वर्षांच्या कारकीर्दीत ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’च्या सरकारने झोपा काढल्या, या भाजपच्या आरोपातील हवा निश्चितच कमी होते.
संगीता जानवलेकर
विज्ञानात फक्त स्थूल शरीराच्या जन्म-मृत्यूचा विचार होतो!

शरद बेडेकर यांचा लेख (मानव-विजय, २० जुलै) वाचला. त्यांनी ९ प्रश्न विचारण्याआधी सृष्टीचे सजीव व निर्जीव, असे भाग केले आहेत. सुरुवातीला त्यांनी म्हटले आहे की, निर्जीव सृष्टीतील मूलद्रव्यांच्या अणुरेणूंवर दीर्घकाल रासायनिक प्रक्रिया होऊन सजीवाची निर्मिती झाली. ही गोष्टच मुळी खोटी आहे. प्रसिद्ध अशा Miller’s Experiment मध्ये ज्या द्रव्यांची निर्मिती झाली तेMethane व Armino Acid होते. त्यात जीवाची उत्पत्ती नव्हती. सजीव सृष्टी या शब्दांतच जीव म्हणजे छ्रऋी आल्यामुळे ते नेमके काय असावे आणि त्यात निर्जीवापेक्षा वेगळे काय आहे, याचा शोध मानव पूर्वीपासून घेत आला आहे. विज्ञान व आध्यात्मिक साधना या दोन्ही मार्गाद्वारे तो आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधू इच्छितो.
भारतीय अध्यात्म दर्शनात या सर्व प्रश्नांचा उलगडा व्यवस्थित करण्यात आला आहे.
खरा आत्मा हा निष्क्रिय, निर्गुण, निराकार, नित्य शाश्वत, शुद्ध, बुद्ध, मुक्त असतो. त्याच्या प्रतिबिंबाच्या उसन्या प्रकाशावर चेतन झालेला सूक्ष्म देह त्याच्यातील सर्व कर्मफले, वासना संपेपर्यंत जन्म-मृत्यूच्या फेऱ्या करीत असतो.
अज्ञानापोटी (अविद्या) जीव त्या उसन्या चेतनेलाच ‘मी’ समजतो व सुखदु:ख भोगतो. जेव्हा कर्म शून्य होतात, वासना संपतात तेव्हा हा उसना मी नष्ट होतो व खरा मी किंवा खरा आत्मा जो नित्य आहे, अजर आहे, अमर आहे हे ज्ञान आपणास होते. तोच मोक्ष! विज्ञानात फक्त स्थूल शरीराच्या जन्म-मृत्यूचा विचार होतो. इतर गोष्टींचा नाही!
– डॉ. अनिरुद्ध गुर्जलवार, नागपूर
(रामचंद्र महाडिक- गोडोली (सातारा) , सुनील मोडक – चेंबूर (मुंबई), योगानंद िशदे ( पुणे ) यांनीही या विषयावर पत्रे पाठविली होती.)

अमर आत्मा!

शरद बेडेकर यांचा लेख (मानव-विजय, २० जुल) वाचला. ते लिहितात, ‘मुळात आत्मा ही कल्पना रचली ती त्याच्या अमरत्वासाठीच होय.’ ..जिथे आपण आयुष्यभर राहिलो तिथे मृत्यूनंतर आपले काहीच उरणार नाही हे माणसाला दु:खदायक वाटले. म्हणून अमर आत्मा आणि पुनर्जन्म या कल्पना रूढ झाल्या हे पटण्यासारखे आहे.
पण गीता आणि उपनिषदे यांतील आत्म्यासंबंधीचे उल्लेख वाचले तर वाटते की, त्यांतील हृदय हे स्थान सोडून बाकी बरेचसे वर्णन मेंदूला लागू पडते. गीतेत ‘भगवान उवाच’ (१५/१५) आहे, ‘‘सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्त: स्मृतिज्र्ञानमपोहनं च।’’ (सर्वाच्या हृदयात मी स्थित आहे. स्मृती, ज्ञान आणि निष्कर्ष काढणारी तर्कबुद्धी माझ्यापासून निघते.) ज्ञानेश्वरीत आहे, ‘एरवी सर्वाच्या हृदयदेशी। मी अमुका आहे ऐशी। जे बुद्धी स्फुरे अहíनशी। ते वस्तु मी गा?’ (४२१/१५). आज आपले जे मेंदूविषयक ज्ञान ते गेल्या तीनशे वर्षांतील आहे. उपनिषदकाळी मेंदूच्या कार्याविषयी काही कल्पना नव्हती. तरी बुद्धिमान ऋषींना वाटत होते की, आपली स्मृती, ज्ञान, बुद्धी, मन यांसाठी काही यंत्रणा शरीरात आहे. चाफ्याचे फूल एकदा हुंगले, नंतर कधी तसा वास आला की तो त्या फुलाचा आहे हे आपल्याला कसे कळते? त्यासाठी हृदयात कोणी तरी आहे असे त्यांनी मानले. त्याला आत्मा असे नाव दिले. पुढे त्या आत्म्याला अनेक गुणधर्म चिकटविले. आणि तो ‘ननं छिन्दन्ति शस्त्राणि। ननं दहति पावक:’। असा अमर आत्मा झाला.
प्रा. य. ना. वालावलकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 1:20 am

Web Title: letter to editor 8
टॅग : Letter
Next Stories
1 दिंडी चालते, वारी कशी काय चालेल?
2 – ‘आत्मावस्था’ तरी मान्य कराल की नाही?
3 आता सरकारची खरी कसोटी ..
Just Now!
X