आयपीएलमधील तीन खेळाडूंनी सध्या सुरू असणाऱ्या आयपीएल सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याचे उघड झाले आणि त्यांना  पोलिसांनी अटक केले. त्यानंतर किती तर व्यक्तींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. काहींना त्यामुळे धक्क बसला, काहींना दु:ख झाले, काहींचा संताप अनावर झाला, काहींनी आता ह्यापुढे आयपीएलचा तमाशा बंद करा, अशीही मागणी केली आहे. पण हा सगळा खटाटोप कशासाठी? यात एवढे रागावण्यासारखे काय आहे? किंवा दु:ख वाटण्यासारखे काय आहे? मुळात आयपीएलच्या कुठल्याही संघातील कुठलाही खेळाडू हा कुठल्याही देशाचे प्रतिनिधित्व करत नाही? त्याला बोली लावून कुठल्या तरी कंपनीने करारबद्ध केलेलं असते. ज्या दिवशी अशा प्रकारचा बाजार भरला आणि आपण तो सर्वानी टाळ्या पिटून आनंदाने स्वीकारला त्याच वेळी आता पशासाठी क्रिकेटच्या खेळात ह्यापुढे काय काय होईल ह्याची कल्पना क्रिकेट जगणाऱ्या क्रिकेटप्रेमींना आली होती. जिथे प्रेमिकांचे प्रेम पैशावर मोजले जाते तिथे क्रिकेटच्या प्रेमाची काय कथा. ह्यापुढे आयपीएलची एखादी कंपनी आपल्या खेळाडूंना आम्ही तुला इतके पसे देऊ, तुला गरज भासली तर तू तुझ्या पद्धतीने अधिक पसे मिळवू शकतोस, अशी मुभादेखील आपल्या खेळाडूंना देऊ शकेल. तेव्हा उगीच डोक्यात राख घालून घेऊ नका. परंतु लोकसभेची आणि क्रिकेटची तुलना करणाऱ्यांची मात्र कमाल आहे. कारण काय तर लोकसभेत काही लोक भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात सापडले आहेत. लोकसभा जशी असेल तशी स्वीकारणे आपल्याला भाग आहे. तेथील प्रत्येक सभासद तो जसा असेल तसा जनतेचे प्रतिनिधित्व करत असतो आणि देशाचे राज्यशकट चालविण्यासाठी लोकसभेची आवश्यकता निर्वविाद आहे. पण आयपीएल बंद झाली तरी कुठलेही संकट देशाच्या जनतेवर पडणार नाहीये. तेव्हा अशी तुलना करणे बालिशपणाचे आहे. परंतु तसे होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. कुबेरालाही लाजवील असे धनाचे कोठार कोण सहजासहजी सोडेल? तेव्हा आपल्याला क्रिकेट कळो अथवा न कळो चीअरगर्ल्स नाचल्या की आपणही टाळ्या पिटून आनंद साजरा करावा.
मोहन गद्रे, कांदिवली.

फक्त चार-दोन खेळाडू एवढं करू शकतात?
सध्या गाजत असलेल्या स्पॉट-फिक्सिंगमधील तीन क्रिकेटपटूंच्या संदर्भात काही प्रामाणिक शंका उपस्थित झाल्या त्या अशा-
गोलंदाजाला ठरावीक षटकात ठरावीक प्रकारचे चेंडू टाकणे आणि त्यावर धावा देणे अशी आगाऊ सूचना दिली असल्यास शंका येते की, एका चेंडूवर ६ धावा काढण्यासाठी चेंडू कसाही टाकला तरी फलंदाजाची तितकी क्षमता नको का? समोरचा फलंदाज ‘त्या’ चेंडूवर तितक्याच अपेक्षित धावा काढेल याची त्यांना खात्री होती काय?
फलंदाजाने पूर्ण क्षमतेसह चेंडू तटवला पण सीमारेषेअलीकडे क्षेत्ररक्षकाने त्याचा झेल घेतला तर? म्हणजे क्षेत्ररक्षक व्यवस्थित क्षेत्ररक्षण करणार नाहीत, याचीही त्यांना खात्री होती काय ?
महत्त्वाचा मुद्दा हा की, एखाद्या संघाविरुद्ध आपला संघ निवडताना अनेक बाबींचा विचार करून मगच खेळाडू निवडले जातात. अशा परिस्थितीत संघाची निवड समिती त्या गोलंदाजाला खेळवणार की नाही हे बुकीजना आधीच कसे कळते?
क्रिकेटसंबंधी ज्ञान असो वा नसो पशाच्या जोरावर संघाचे मालक बनलेल्या व्यक्ती संघाची निवड करण्यात हस्तक्षेप करतात का?
    या सर्व बाबींकडे पाहता प्रश्न पडतो की, फक्त एखाद-दुसरा गोलंदाजच या स्पॉट-फिक्सिंगमध्ये जबाबदार असू शकेल काय? की या संपूर्ण उलाढालीत एखाद-दोन किरकोळ मासे जाळ्यात अडकवून इतर अनेक मोठमोठे मासे जाणूनबुजून जाळ्याबाहेर ठेवले जातात काय? की याची कुठे वाच्यताच केली जात नाही?   
अविनाश पाध्ये

आता प्रेक्षकांनीच ठरवावे
आता आयपीएलचे पितळ चांगलेच उघडे पडले आहे. एकीकडे खेळाडूंना गुलामासारखे विकत घेऊन कोंबडय़ांसारखे झुंजवायचे, दुसरीकडे त्यांना बुकींकडून लाच देऊन खोटे विजय – पराजय घडवायाचे आणि प्रेक्षकांच्या हद्दीबाहेर गेलेल्या क्रिकेटवेडाचा फायदा घेत करोडो रुपयांचा मलिदा मिळवायचा- हे सगळे कुठे तरी कायमचे थांबवायला हवे. मनात आणले तर बीसीसीआय हे करू शकेल, पण मग त्यांच्याच साम्राज्याला हादरा बसेल त्याचे काय? तेव्हा आता प्रेक्षकांनीच आयपीएलच्या नशेतून स्वत:ला बाहेर काढून सारासार विचार करायला हवा की, कुठपर्यंत आपण या व्यसनापायी स्वत:ची फसवणूक करून घ्यायची आणि आपल्याला मूर्ख बनवणाऱ्या लोकांची धन करून द्यायची, जर प्रेक्षकांनीच आयपीएल बघायचे थांबवले तरच हे शक्य होईल, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कोण जागे करणार?
राजीव मुळ्ये, दादर, मुंबई</p>

आयपीएल सामने असे खेळू या !
फिक्सिंगमध्ये आणखी रॉयल्स ही आपली बातमी वाचली. आयपीएल हा खेळ आहे, व्यवसाय आहे, जुगार आहे का एक मान्यताप्राप्त व्यसन आहे, याबद्दल आपणा सर्वाच्याच मनात गोंधळ आहे. आपण या खेळाचे संपूर्ण लोकशाहीकरण करून टाकू या, म्हणजे ज्यांना हा खेळ म्हणून पीहायचा असेल त्यांनी फक्त दोन विकेटमध्ये जे चालले आहे ते भक्तिभावाने पाहावे. ज्या संघांना कामगिरीपेक्षा पसे मिळविण्यात रस आहे त्यांनी बुकींशी संपर्क साधून हा खेळ कसा खेळला पाहिजे याविषयी मार्गदर्शन घ्यावे. खेळाडूंनीही आपल्या मालकांना सांगून किंवा न सांगता फिक्सिंगमध्ये सहभाग घ्यावा. सांगून घेतलेल्या सहभागाबद्दल मालकांना कमिशन द्यावे. न सांगून लावलेल्या दिव्यांची जबाबदारी आपल्या शिरावर घ्यावी! तसेच टॉवेल कसा आणि कधी दाखवायचा याचे खेळाडूंना बीसीसीआयमार्फत प्रशिक्षण द्यावे. सामना कोण जिंकणार याबाबत क्रिकेट तज्ज्ञांचे केवळ मत विचारात न घेता सुनील गावसकर आणि हर्ष भोगले यांच्याबरोबर या बुक्कींनाही वाहिन्यांनी आमंत्रित करावे. जो संघ जास्तीत जास्त गोंधळ घालून माध्यमाचे लक्ष्य सरकारी घोटाळ्यापासून विचलित करेल त्या संघाच्या मालकांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करावी. मदानावर खेळाव्यतिरिक्त होणाऱ्या हालचालींवर प्रेक्षकांना बारीक लक्ष ठेवायला सांगून त्यांना त्या सामन्यात कोणी फिक्सिंग केले हे ओळखण्याची स्पर्धा घ्यावी. विजेत्यांना भरघोस बक्षिसे द्यावीत. असे केल्याने वृत्तवाहिन्यांचे सनसनाटी बातम्या देता न आल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांना सरकारने सानुग्रह अनुदान द्यावे आणि सर्वाना सुखी करावे
अनघा गोखले, मुंबई

अंजेलिनाच्या सरसकट अनुकरणाची भीती
काल-परवा अभिनेत्री अंजेलिना जोली हिने कर्करोगास प्रतिबंध म्हणून ऊु’ी-टं२३ीू३े८ चा निर्णय घेतला, त्यामुळे तिला भविष्यात होऊ घातलेल्या कर्करोगाची शक्यता ८७ टक्केवरून ५ टक्के इतकी झाली. तिच्या या धाडसी निर्णयाचे (की कमालीच्या घाबरटपणाचे) मीडिया, वैद्यकीय क्षेत्र, तिचे सहकलाकार यांनी तोंड भरून कौतुक केले. कर्करोग हा पुढचा विषय. पण अंजेलिनाच्या या निर्णयाने कर्करोगाविषयी कितपत जागरुकता निर्माण होईल सांगता येणार नाही, पण समाजात आधीच बळावलेल्याोएअफ ढरउऌडरकर या नव्या आणि झपाटय़ाने पसरत असलेल्या प्रकारात नक्कीच वाढ होईल आणि ‘व्यावसायिक’ मंडळी वाहत्या गंगेत हात धुऊन त्याचा फायदा करून घेणार. सिझेरियनचे उदाहरण आपल्यासमोर आहेच, पण गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेनेही जगभरात विक्रमी आकडा गाठला आहे, भारतासारख्या देशात तर या गोष्टींनी कळसच गाठलाय. गुजरातसारख्या तथाकथित विकसनशील राज्यात २०१० साली घेण्यात आलेल्या ४ हजार स्त्रियांच्या सव्‍‌र्हेमध्ये ५० टक्के स्त्रियांनी गर्भाशय शस्त्रक्रियेने काढले असल्याचे निदर्शनास आले, यातील बहुसंख्य़ स्त्रिया चाळिशीच्या आतील होत्या. तसं बघायला गेलं तर प्रत्येक स्त्रीला वर्षभरातून एकदा पाळीचा त्रास होतो, पण ‘शस्त्रक्रिया’ फायद्याची आहे हे पटवून देऊन काही लोक आपले खिसे भरतात. भले अवेळी गमावलेल्या महत्त्वाच्या अवयवामुळे स्त्रीचे आरोग्य पुढे कितीही खालावू देत. बरं हे सगळं माहीत असलेल्या स्त्रियाही अशा शस्त्रक्रिया करवून घेतात, कारणं इतर काहीही असोत, पण मुख्य कारण पुन्हा तेच ते म्हणजे भीती. आता या भीतीच्या अनुषंगाने एक मोठं अर्थकारण इथे फिरत असतं. आता टं२३ीू३े८  म्हणजे ‘शस्त्रक्रिया’ आलीच. शस्त्रक्रिया झाली म्हणजे कटछअठळ आलेच. त्यामुळेच जसा सिझेरियन आणि हिस्टेरेक्टोमीचा ‘बाजार’ मांडला गेलाय, तसं या बाबतीतही होणार, त्यामुळे अंजेलिनाचं हे पाऊल तिचा वैयक्तिक निर्णय असला, तरी सर्वानी त्याकडे एक ‘सेलिब्रिटी डिसिजन’ म्हणून न बघता डोळसपणे बघावे आणि आरोग्य हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असल्याने समाजात विशेषत: स्त्रियांत आणि वैद्यकीय व्यावसायिकांत ‘खरा आजार, आवश्यक तेवढाच उपचार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेोएअफ ढरउऌडरकर याबद्दल चिंतन होणे ही काळाची गरज आहे.
    -डॉ. प्रज्ञावंत देवळेकर, पुणे</p>