● द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड ( NIACL) (भारत सरकारचा उपक्रम). अॅप्रेंटिसेस अॅक्ट १९६१ अंतर्गत अॅप्रेंटिसेसची भरती.

एकूण रिक्त पदे – ५००. राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशिल – (कंसात प्रादेशिक कार्यालयाचे नाव दिले आहे.) महाराष्ट्र (मुंबई – I, मुंबई – III, मुंबई – V, नागपूर, पुणे) – एकूण १२० पदे (अजा – १२, अज – १०, इमाव – ३२, ईडब्ल्यूएस – १२, खुला – ५४) (५ पदे दिव्यांग (कॅटेगरी VI – २, HI – १, OH – १ साठी प्रत्येकी १ पद) साठी राखीव).

गोवा (मुंबई – II) – एकूण १ पद (खुला), गुजरात (अहमदाबाद, सूरत) – ३३ पदे, आंध्र प्रदेश (हैद्राबाद) – १६, कर्नाटक (बेंगलुरू) – २१ पदे, मध्य प्रदेश (भोपाळ) – १७ पदे, तेलंगणा (हैद्राबाद) – १७ पदे इ.

१२ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधी दरम्यान उमेदवारांना दरमहा रु. ९,०००/- स्टायपेंड दिले जाईल.

पात्रता – (दि. १ एप्रिल २०२१ किंवा त्यानंतर) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.

वयोमर्यादा – (दि. १ जून २०२५ रोजी) २१ ते ३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे). (विधवा, घटस्फोटीत, कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – खुला/ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षेपर्यंत अर्ज करण्यास पात्र आहेत.)

रजा – प्रशिक्षणार्थींना एका महिन्यासाठी (महिना संपल्यानंतर) १ दिवसाची रजा जमा होईल. एका वेळेस ४ दिवसांची रजा घेवू शकतील. प्रशिक्षणार्थी गैरहजर राहिल्यास एका महिन्यासाठी मिळालेले स्टायपेंड त्यांना कंपनीस परत करावे लागेल.

अॅप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना असेसमेंट टेस्ट द्यावी लागेल. ज्यात थिअरॉटिकल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग कंपोनंट यांचा समावेश असेल. थिअरी असेसमेंट BFSI सेक्टर स्किल काऊन्सिल ऑफ इंडिया ( BFSI SSC) मार्फत केली जाईल. प्रॅक्टिकल असेसमेंट कंपनीकडून केली जाईल. असेसमेंट टेस्टमधील गुणवत्तेनुसार प्रशिक्षणार्थींना अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट इारक द्वारा दिले जाईल.

निवड पद्धती – ( i) ऑनलाइन लेखी परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाईप), (१) जनरल/फिनान्शियल अवेअरनेस, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग अॅप्टिट्यूड, (४) कॉम्प्युटर नॉलेज. प्रत्येकी २५ प्रश्न/२५ गुणांसाठी, एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे.

लेखी परीक्षा दि. २६ जून २०२५ रोजी घेतली जाईल.

ऑनलाइन एक्झामिनेशन उमेदवारांना नेमून दिलेल्या दिवशी द्यावी लागेल.

( ii) रिजनल लँग्वेज टेस्ट – ज्या राज्यातील पदांसाठी उमेदवारांनी अर्ज केला आहे, त्या राज्याची स्थानिय भाषा त्यांना अवगत असणे आवश्यक. (वाचता, लिहिता, बोलता येणे आणि समजणे आवश्यक.)

संबंधित भाषा १० वी, १२ वीला अभ्यासली असल्यास पुराव्यासाठी १० वी/१२ वीचे प्रमाणपत्र सादर केल्यास उमेदवारांना स्थानिय भाषेची परीक्षा माफ असेल. इतरांना रिजनल लँग्वेज टेस्ट द्यावी लागेल.

लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या ३ पट उमेदवार रिजनल लँग्वेज टेस्ट आणि कागदपत्र पडताळणीसाठी निवडले जातील. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नेमणूकीचे ठिकाण, दिनांक BFSI SSC मार्फत मेलद्वारे कळविण्यात येईल.

परीक्षा शुल्क – खुला/इमाव – रु. ८००/-, अजा/अज/महिला – रु. ६००/-, दिव्यांग – रु. ४००/-. (याशिवाय लागू असलेल्या GST कर भरावा लागेल.)

https:// nats. education. gov. in/ या लिंकवर उमेदवारांनी अॅप्रेंटिसशिपकरिता २० जून २०२५ पर्यंत अर्ज करावे.

शंकासमाधान आणि विस्तृत माहिती http:// newindia. co. in या संकेतस्थळावरील Information and help section मध्ये उपलब्ध आहे.

बेस्ट

● एसएससी उत्तीर्ण उमेदवारांना तसेच आयटीआय आणि एम.सी.व्ही.सी. उत्तीर्ण उमेदवारांना बृहन्मुंबई विद्याुत पुरवठा आणि परिवहन उपक्रम ( BEST), तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, वडाळा, मुंबई – ४०० ०३१ येथे शिकाऊ उमेदवार कायदा १९६१ अनुसार ऑगस्ट, २०२५ या सत्राकरिता व्यवसाय प्रशिक्षणार्थी ( Trade Apprentices) ची भरती.

BEST च्या परिवहन अभियांत्रिकी विभाग/विद्याुत पुरवठा विभागासाठी कुशल व कार्यक्षम मनुष्यबळ विकसित करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, वडाळा येथे पात्रतेनुसार पुढील ट्रेडसाठी अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग दिली जाईल. ( I) एसएससी(गणित व शास्त्र विषयांसह) उत्तीर्ण ५० टक्के गुण (अजा/अज ४५ टक्के गुण). अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग कालावधी २ वर्षं.

स्टायपेंड – दरमहा रु. ७,१०१/- पहिल्या वर्षी; रु. ८,११५ दुसऱया वर्षी.

(१) मेकॅनिक (मोटर वाहन) ६० पदे, (२) ऑटो इलेक्ट्रिशियन – ३८ पदे, (३) रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक – ५ पदे, (४) केबल जॉईंटर – १० पदे.

( II) आयटीआय उत्तीर्ण. (जुलै २०२५ च्या अंतिम व्यवसाय चाचणीस ( ITI परीक्षेस) बसणारे उमेदवारसुद्धा पात्र आहेत.) अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग कालावधी १ वर्ष.

स्टायपेंड – दरमहा रु. ८,१२५/- (वेल्डर ट्रेडसाठी); रु. ९,१३० इतर ट्रेड्ससाठी.

(१) मेकॅनिक (मोटर वाहन) १४५ पदे, (२) फिटर – ४ पदे, (३) टर्नर – ८ पदे, (४) वेल्डर – २५ पदे, (५) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – २० पदे, (६) केबल जॉईंटर – ४ पदे, (७) वायरमन – २५ पदे, (८) इलेक्ट्रिशियन – ५०, (९) धातू पत्रा कारागिर – १०.

( III) १२ वी एम्.सी.व्ही.सी. (मेकॅनिकल टेक्नॉलॉजी व ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विषयांसह) उत्तीर्ण. अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग कालावधी १ वर्ष.

स्टायपेंड – दरमहा रु. ७,१०१/-.

(१) मेकॅनिक (मोटर वाहन) ३६ पदे, (२) फिटर – १२ पदे, (३) टर्नर – २ पदे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२५.

निवड यादी ७ जुलै २०२५ नंतर प्रसिद्ध केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhaspatil237 @gmail. com