‘एमटीव्ही’ या संगीत वाहिनीने काय सांस्कृतिक आणि दृश्यिक बदल केला, याची महत्ता नव्वदीच्या दशकात तारुण्यात असलेल्यांनाच अधिक. आदल्या पिढीने एमटीव्ही प्रेम असलेल्या पिढीला उद्धट, अप्पलपोट आणि वेळखर्चट ठरविले, तरी त्यांचा-त्यांचा विकास होत होताच. एमटीव्ही नसता तर पॉप संगीताचे, म्युझिक व्हिडीओचे पर्व भारतात अवतरते ना. पाकिस्तानी, सुफी संगीताचा आनंद इथले लोक घेते ना. चित्रसंगीत आणि नवसंगीतकारांचा ताफा येता ना. एमटीव्हीने आपल्या तरुण चाहत्यांसाठी पुस्तक प्रकाशनाचाही उपक्रम राबविला. त्यातून काही खूपविक्या कादंबऱ्या आणि सिनेमांनाही वाट मिळाली. भारतातून ३१ डिसेंबरला शेवटचा श्वास थांबेल. रिअॅलिटी शोजनंतर हळूहळू घसरणीला लागलेल्या एमटीव्हीच्या पुस्तक प्रयोगाची विस्तारात माहिती सांगणारा लेख.
● https://tinyurl.com/4mtpbyxx
सेल्फिश हेल्प बुक्स…
हा तर खूप पुरातन प्रश्न आहे. नव्वदीआधीही तो होता. पण तेव्हा रस्त्यावरच्या ग्रंथदालनांत आणि वातानुकूलित पुस्तकालयांत ‘सेल्फ हेल्प बुक्स’ खूपविक्या प्रवाहात नव्हती. आता ती आहेत आणि बहुजनांना तीच अधिक वाचली जात असल्याचा भ्रमदेखील निर्माण करून दिला जात आहे. गार्डियनच्या या लेखात सेल्फिश हेल्प बुक्सचा सखोल विचार केलेला दिसतो. त्यामुळे अधिक सोसाने ती खरेदी करणाऱ्यांसाठी चवबदल.
● https://tinyurl.com/3f2y63ux
मुलाखतीतून नोबेल विजेता…
लास्लो क्रास्नाहोरकाई यांना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर आता त्यांच्या पुस्तकांची आणि कठीण वाटणाऱ्या निवेदनाची पुढील काही दिवसांत कुतूहलपूर्ण चिकित्सा होईल. छोटी वाक्ये आणि अचूक अवतरणप्रचुर लिखाण शिकविणाऱ्या भाषाविषयक प्राध्यापकांची तर गंमत उडेल. कारण या सगळ्या बाबी कथानकातील ताकदीपुढे गौण ठरतात, हेच क्रास्नाहोरकाई यांनी हयातीत दाखवून दिले. ही मुलाखत काही वर्षांपूर्वीची. इंग्रजीत भाषांतर होऊनच आलेली. स्वत:च्या कथा आणि कादंबऱ्या तसेच लिखाणाची आडमुडी शैली ठरविण्याविषयीचीदेखील. त्याशिवाय २००१ साली आंग्ल भाषिक जगाला क्रास्नाहोरकाई यांच्या इंग्रजीत अनुवादित कादंबरीची पहिल्यांदाच ओळख करून देणाऱ्या लेखाचा दुवा.
● https://tinyurl.com/uk8pk6pd
● https://tinyurl.com/35mr43an