‘तू आम्हाला ज्या भावना जागविण्याची संधी दिलीस, स्वप्न दाखवलेस, यश साजरे करण्याचे निमित्त दिलेस, राष्ट्रीय ध्वज उराशी कवटाळण्याचे आणि अभिमानाने फडकाविण्याचे औचित्य दिलेस, त्या सगळ्या क्षणांसाठी मनापासून धन्यवाद…!’ इटलीचा लाडका फुटबॉलपटू साल्वातोर स्किलाचीचे बुधवारी निधन झाल्यानंतर त्या देशाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या शब्दांत त्याला श्रद्धांजली वाहिली. इटलीसारख्या फुटबॉलप्रेमी देशात एखाद्या माजी खेळाडूचे नुसते असणेही किती भावनिक असते, त्याचे हे दर्शन!

स्किलाची गेला, तेव्हा त्याचे वय होते ५९ वर्षे. गेली दोन वर्षे तो कर्करोगाशी झुंजत होता. तो होताच लढवय्या. ज्यांनी कुणी १९९० मध्ये इटलीत झालेल्या फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेतील इटलीचे सामने पाहिले असतील, त्यांना आठवेल, की आक्रमक फळीत खेळणाऱ्या स्किलाचीची प्रतिस्पर्ध्याच्या गोलकडे घेतलेली धाव पाहिली, की हा समोरच्या संघाच्या बचावफळीला गोलबचावाची फार काही संधी देईल, असे वाटायचेच नाही. या स्पर्धेत त्याने सर्वाधिक सहा गोल करून त्याचे कर्तृत्व सिद्ध केलेच. १९९० चा फुटबॉल विश्वकरंडक भारतीय फुटबॉलप्रेमींसाठीही स्मरणरंजनाची रम्य आठवणखूण आहे. ‘इटालिया ९०’ या नावाने ओळखल्या गेलेल्या या स्पर्धेतील बहुतेक सर्व सामने दूरदर्शनवरून दाखवले गेले होते आणि म्हणून स्किलाचीही भारतीय फुटबॉलप्रेमींच्या स्मृतिकोंदणात पक्का बसला. स्किलाचीने या स्पर्धेत ऑस्ट्रियाविरुद्ध पहिला गोल केला होता. या सामन्यात तो खरे तर राखीव खेळाडू होता. पण, इटलीच्या प्रशिक्षक अझेग्लिओ व्हिसिनीने स्किलाचीला आंद्रिया कार्नेव्हेलच्या जागी उतरवले आणि स्किलाचीने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. ऑस्ट्रियाविरुद्धचा एकमेव विजयी गोल त्याचाच होता. नंतर पुढच्या (तत्कालीन) झेकोस्लोव्हाकियाविरुद्धच्या सामन्यातही राखीव म्हणून उतरून त्याने एक गोल केला.

loksatta editorial one nation one election
अग्रलेख: होऊन जाऊ दे…!
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
loksatta editorial marathi news
अग्रलेख : दोन ध्रुवांवर दोघे
US Federal Reserve
अन्वयार्थ: ‘फेडरल रिझर्व्ह’ने करून दाखवले!
loksatta editorial on National Science Awards
अग्रलेख : नंदीबैल नगरी!
loksatta editorial on ajit ranade marathi news,
अग्रलेख : ‘माहेर’चे मस्तवाल!
RSS chief Mohan Bhagwat remark on Manipur violence
अग्रलेख : सरसंघचालकांचे तरी ऐका…
Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury in marathi
अग्रलेख : उजवा डावा!

हेही वाचा : चतु:सूत्र : जगण्याचा अधिकार!

इटलीचा अन्य तारा रॉबेर्तो बॅजिओबरोबर त्याची आक्रमणफळीत जोडी जमली आणि या दुकलीने पुढच्या सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत उपांत्य फेरी गाठली. तोवर स्किलाचीने उरुग्वे आणि आयर्लंडविरुद्ध गोल करून आपली क्षमता सिद्ध केली होती. उपान्त्य सामन्यात नेपल्समध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर स्किलाचीने पहिला गोल करून दिएगो मॅरेडोनाच्या अर्जेंटिनाला घाम फोडला. पण, या सामन्यात इटलीच्या बाजूने प्रेक्षक असले, तरी नशीब नव्हते. अर्जेंटिनाच्या क्लॉडिओ कनेजियाच्या गोलमुळे बरोबरी झाली आणि सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. त्यात अर्जेंटिना वरचढ ठरली.

इटलीचा पराभव होऊनही स्किलाचीबद्दल मात्र इटालियनांचे प्रेम वाढतेच राहिले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत इंग्लंडला पराभूत करतानाही त्याने गोल करून त्या स्पर्धेतील गोल्डन बूट किताब पटकावला. स्किलाचीने युव्हेन्टस या प्रतिष्ठित इटालियन क्लबचा सदस्य म्हणूनही मैदान गाजवले. यानंतर तो इटलीसाठी कोणत्याही महत्त्वाच्या स्पर्धांत खेळला नाही. असे असूनही काही खेळाडू चाहत्यांच्या मनात कायमचे कोरले जातात. टोटो या टोपणनावाने ओळखला जाणारा स्किलाचीही याच जातकुळीतला.

हेही वाचा : उलटा चष्मा : नेत्यांचे अजब आर्जव

‘मी बहुधा स्वप्न पाहतो आहे. मी काही खेळातला तारा नाही,’ हे स्किलाचीचे १९९० मधील यशानंतरचे नम्र उद्गार. फुटबॉलवर निस्सीम प्रेम करणाऱ्यांसाठी मात्र स्किलाची आता तारा झाला, आहे!