अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थस्थितीला ‘जागतिक वाळवंटातील हिरव्या बेटा’ची काव्यात्म उपमा दिली असली तरी आपलाच सांख्यिकी विभाग त्यातील काळे वास्तव मांडतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारखानदारीकडे दुर्लक्ष करून सेवा क्षेत्राचा उदोउदो करणे म्हणजे मुख्य जेवणाऐवजी फरसाण भरत बसण्यासारखे, असे ‘लोकसत्ता’ वारंवार सांगत आला आहे. चालू वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचा जाहीर झालेला सांख्यिकी तपशील नेमके हेच सत्य अधोरेखित करतो. केंद्र सरकारच्या सांख्यिकी संचालनालयातर्फे प्रसृत आकडेवारीतून हे दिसते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठीची ही आकडेवारी बुधवारी प्रसिद्ध झाली. गेले काही महिने विकसित देशांत आर्थिक आघाडीवर मंदीसदृश वातावरण आहे. इंग्लंड, अमेरिका आदी देशांनी तर अधिकृतपणे मंदीचे इशारे दिले आहेत. युरोपीय देशांतही परिस्थिती बरी नाही आणि इतकी वर्षे जागतिक मागणीचा मोठा वाटेकरी असलेला चीनदेखील गळपटलेला आहे. याचे प्रतििबब आपल्या निर्यातीत सातत्याने पडू लागले आहे. पाश्चात्त्य देशांत मागणी मंदावल्यामुळे मालास उठाव नाही. तसेच अ‍ॅमेझॉनसह अनेक जण सर्वास हातचे राखून खर्च करण्याचे सल्ले देत असल्याने नागरिकही काटकसर करताना दिसतात. त्यात माहिती तंत्रज्ञानादी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेली कर्मचारी छाटणी. त्यात आज ‘सीएनएन’ या बलाढय़ वाहिनीने दिलेल्या कर्मचारी कपातीच्या इशाऱ्याची भर पडली आहे. तेव्हा आर्थिक वातावरण तसे नरम-गरमच म्हणायचे. ते तसे असल्याचे आपल्या धुरीणांस अमान्य होते. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर जागतिक वाळवंटात भारत हा कसा हिरव्या बेटासारखा आहे, असे काव्यात्म वर्णन आपल्या अर्थस्थितीचे केले. परंतु आपलाच सांख्यिकी विभाग या हिरव्या बेटामागील काळे वास्तव समोर मांडतो.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India q2 gdp growth india s gross domestic product grows at 6 3 percent in q2 zws
First published on: 02-12-2022 at 04:50 IST